आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर लँगरकडून घेतोय प्रशिक्षण, फॉर्म परत मिळवण्यासाठी प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी गौतम गंभीरने आस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज जस्टिन लँगरच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे.
जवळपास पाच वर्षांपासून संघातून आत-बाहेर होत असलेला ३३ वर्षीय गंभीर म्हणाला, "मी मागच्या वर्षी चॅम्पियन्स लीगदरम्यान लँगरशी भेटलो होतो. त्यावेळी ते पर्थ स्कॉर्चर्सचे कोच म्हणून दौऱ्यावर होते. फलंदाजी आणि इतर काही विषयांवर माझी त्यांच्याशी चर्चा झाली. ते माझ्या खेळावर मेहनत घेऊ शकतात, असे मला वाटले. मी त्यांच्याकडे मदत मागितली आणि ते तयार झाले.' ५६ कसोटी आणि १४७ वनडे खेळण्याचा अनुभव असलेला गंभीर म्हणाला, "मी आधी सुद्धा लँगर यांना भेटलो आहे. त्यांचे बरेच इंटरव्ह्यू मी वाचले आहेत. माझ्यात आणि लँगरमध्ये मला बरेच साम्य वाटते. आमच्यात बरीच समानता आहे. त्यांचा वेग आणि खेळपट्टी फलंदाजी करण्याची क्षमता मला प्रभावित करते. लँगरसोबत जुळाल्याने माझ्या खेळात सुधारणा होईल, असे मला वाटते.'
गंभीरच्या आधी हरभजनसिंग आणि युवराजसिंग यांनी सुद्धा विदेशात प्रशिक्षण घेतले आहे. सोमवारी झिम्बाब्वेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात हरभजनचा समावेश झाल्याने इतर खेळाडूंतही आत्मविश्वास निर्माण झाला आहे. २०१२ मध्ये कसोटी आणि नंतर वनडे संघातून गंभीर बाहेर झाला होता.
बातम्या आणखी आहेत...