आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे टीम इंडियाची नवी मॅच विनर, विराट ते धोनीपर्यंत सर्वांसोबत PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरमनप्रीत कौर विराट कोहलीसह - Divya Marathi
हरमनप्रीत कौर विराट कोहलीसह
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला क्रिकेट टीमने मंगळवारी दक्षिण अफ्रिकेला 1 विकेटने हरवत ICC वुमन्स वर्ल्ड कप क्वालिफायर टूर्नामेंटमध्ये विजय मिळवला. या मॅचमध्ये टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार मॅच विनिंग इनिंग खेळली आणि नाबाद 41 धावा केल्या. शेवटच्या षटकात सिक्स मारत टीमला विजय मिळवून दिला. कोण आहे हरमनप्रीत कौर...
 
- हरमनप्रीत पंजाबमधील मोगा येथील राहणारी आहे. तिचा जन्म 8 मार्च 1989 रोजी झाला.  
- उजव्या हाताने फलंदाजी करणारी हरमनप्रीत गोलंदाजीही करते. 
- तिने 64 वनडे मॅचेसमध्ये 1632 धावा आणि 68 टी-20 मॅचेसमध्ये 1223 धावा केल्या आहेत. 
- हरमनप्रीत ऑस्ट्रेलियात होणा-या महिला बिग बॅश टी-20 लीग खेळणारी पहिली भारतीय महिला प्लेयर आहे. 
- जून 2016 मध्ये तिला बिग बॅश लीगमधील टीम सिडनी थंडरने साईन केले आहे. 
 
आफ्रिकेवर केली मात-
 
- कर्णधार हरमनप्रीत कौरने (नाबाद ४१) शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला महिलांच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या फायनलमध्ये विजय मिळवून दिला. 
- भारतीय महिलांनी मंगळवारी अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर १ विकेटने रोमहर्षक विजय संपादन केला. भारताची दीप्ती शर्मा सामनावीर व आफ्रिकेची लुस मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
- आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ९ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. 
- यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने एकाकी झुंज दिली. दीप्ती शर्मा (७१) आणि मोना मेश्राम (५९) यांनी विजयामध्ये अर्धशतकाचे मोलाचे योगदान दिले. 
- सलामीवीर मोना मेश्राम व दीप्तीने तुफानी फटकेबाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर त्यांनी संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. 
- यादरम्यान दीप्तीने शानदार अर्धशतक ठोकले. तिने ८९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांसह सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. मोनाने ८२ चेंडूंमध्ये ५९ धावा काढल्या. यात ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

राजेश्वरी, शिखाची धारदार गोलंदाजी-
 
- युवा गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडेने धारदार गोलंदाजी केली. त्यामुळे आफ्रिकेला २४४ धावांमध्ये गाशा गुंडाळावा लागला. 
- राजेश्वरीने ९ षटकांत ५१ धावा देताना ३ विकेट घेतल्या. शिखाने ८ षटकांत ४१ धावा देऊन २ गडी बाद केले. तसेच एकता बिस्ट, पूनम यादव आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ बळी घेतला. 
- यातूनच आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांना समाधानकारक खेळी करता आली नाही. आफ्रिकेकडून प्रिझने सर्वाधिक ४० धावा काढल्या.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पर्सनल लाईफमध्ये कशी आहे हरमनप्रीत...
 
बातम्या आणखी आहेत...