आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrishikesh Kanitkar Declares Retirement From All Formats

ऋषिकेश कानिटकरची निवृत्ती जाहीर, दोन कसोटी, ३४ वनडेत भारताचे प्रतिनिधित्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ४० वर्षीय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकरने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो आता प्रशिक्षक म्हणून आपले नशीब आजमावणार आहे. भारताकडून दोन कसोटी व ३४ वनडे सामने खेळलेल्या कानिटकरने ३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरनंतर २००० पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्ष दिले.
तो महाराष्ट्र रणजी संघाचा सदस्य होता. २०१३ मध्ये तो राजस्थानकडून खेळला आणि रणजीचे विजेतेपदही जिंकले. मी अजूनही फलंदाजीत चांगले योगदान देऊ शकतो. मात्र, क्षेत्ररक्षणासाठी आवश्यक चपळता आता माझ्याकडे नाही, असे कानिटकरने म्हटले.
कानिटकरचा प्रवास
- प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १०,४०० धावा. यात एकूण ३३ शतके, ४६ अर्धशतके ठोकली.
- एलिट व प्लेट लीग किताब जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.
- रणजीत तो महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानकडून खेळला.
- कानिटकरने काही दिवसांपूर्वीच अंडर १९ क्रिकेटपटूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ईस्ट झोन शिबिराचे आयोजन केले होते.
- दोन कसोटी, ३४ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.