Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | ICC cricket world cup quarterfinal players head to head

WC 2015 : भारतासमोर महमदुल्लाह तर बांग्लादेशसमोर शमीचे अाव्हान

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 19, 2015, 09:09 AM IST

विराट कोहलीच्या तुलनेत बांगलादेशचा महमदुल्लाह अधिक धावा करत आहे. विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

 • ICC cricket world cup quarterfinal players head to head
  टीम इंडिया 19 मार्च रोजी म्हणजे उद्या बांगलादेशच्या विरोधात मेलबर्नमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. दोन्ही टीमच्या टॉप पाच प्लेअरवर नजर टाकली असता ओपनिंगच्या बाबतीत शिखर धवन बांगलादेशच्या तमित इकबालच्या बराच पुढे आहे. तर भाराताला बांगलादेशच्या मधल्या फळीमुळे आव्हान निर्माण होऊ शकते. विराट कोहलीच्या तुलनेत बांगलादेशचा महमदुल्लाह अधिक धावा करत आहे. विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

  बॉलिंगचा विचार करता मोहम्मद शमी बांग्लादेशच्या रूबेल हुसेनच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करत आहे. अष्टपैलू कामगिरीचा विचार करता बांगलादेशचा शाकिब अल हसन रवींद्र जडेजाच्या पुढे आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता, टीम इंडिया बॅटींगच्या तुलनेत बॉलींगने अधिक दबाव टाण्याचा प्रयत्न करेल.

  आतापर्यंतचे विक्रम
  - इंडिया आणि बांगलादेश यांच्यात एकूण 28 वन डे सामने झाले आहेत. त्यापैकी 24 भारताने तर बांगलादेशने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता.
  - वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले आहेत. त्यापैकी दोघांनी एक एक विजय मिळवला आहे.
  - प्रथमच हे दोनही संघ नॉकआऊट फेरीत एकमेकांसमोर असतील. त्याआधीचे दोन्ही सामने साखळी फेरीत झाले होते.
  - भारताकडून वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या विरोधात दोन शतके झळकली आहेत. वीरेंद्र सेहवागच्या 175 आणि विराट कोहली 100 यांचा त्यात समावेश आहे.
  - धोनीला अद्याप बांगलादेशच्या विरोधात विश्वचषकात खाते खोलता आलेले नाही. तो 2007 मध्ये केवळ 3 चेंडू खेळून 0 वर बाद झाला होता.
  - 2007 मध्ये बांगलादेशने सामना जिंकला होता. त्यावेळी मशरफ मुर्तजाने 4 बळी घेतले होते. तो आता बांगलादेशचा कर्णधार आहे.
  - बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला अद्याप भारताविरोधात विश्वचषकात शतक करता आलले नाही. तमिम इकबालने 2011 मध्ये सर्वाधिक 70 धावा केल्या होत्या.
  - बांग्लादेशच्या टीममध्ये गेल्यावेळी भारताविरुद्ध खेळलेले 6 प्लेयर्स आहेत.
  - भारताच्या केवळ धोनी आणि कोहलीने गेल्यावेळी विश्वचषकात बांगलादेशच्या विरोधातील सामना खेळला होता.

  बांगलादेशविरोधात अखेरच्या 5 सामन्यांचा निकाल
  मॅच
  चषक
  विजेता
  जून 2014
  इंडिया टूर ऑफ बांगलादेश
  इंडिया
  फेब्रुवारी 2014
  एशिया कप
  इंडिया
  मार्च 2012
  एशिया कप
  बांगलादेश
  फेब्रुवारी 2011
  वर्ल्ड कप
  इंडिया
  जून 2010
  एशिया कप
  इंडिया
  पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रमुख खेळाडुंचे अॅनालिसिस...

 • ICC cricket world cup quarterfinal players head to head
 • ICC cricket world cup quarterfinal players head to head
 • ICC cricket world cup quarterfinal players head to head
 • ICC cricket world cup quarterfinal players head to head

Trending