आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयम माझा साथी, साहस माझी शान : गौतम गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या १३ कसोटी सामन्यांच्या होम सिरीजसाठी ही पहिली बैठक होती. दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला सलामीवीर गौतम गंभीरची शिखर धवनच्या जागी निवड होण्याची दाट शक्यता होती. मात्र, त्याची संघात निवड होऊ शकली नाही.
संघात निवड न होऊ शकल्यानंतर नाराज गंभीरने िट्वटरवर आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली. गंभीर म्हणाला, “मी निराश नाही आणि पराभूतसुद्धा झालेलो नाही. मला दुर्लक्षित करण्यात आले आहे. मात्र, मी पळपुटा नाही. संयम माझा सहकारी आणि साहस माझी शान आहे. यासाठी मी यापुढेही लढत राहीन, लढत राहणार आणि मला लढायचे आहे.’
गंभीर-कोहली यांच्यात मतभेद : विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही नवी दिल्लीतील आहेत. दोघांत आयपीएलमध्ये एकदा भांडण झाले होते. कोहली इतक्या लवकर कर्णधार बनेल, हे त्या वेळी गंभीरला माहिती नव्हते. गंभीरच्या निवडीच्या बाजूने बहुधा विराटचे मत नाही.
गंभीरची चार अर्धशतके
गंभीरच्या कामगिरीचा विचार केला तर त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सलगपणे चांगली कामगिरी करताना दुलीप ट्रॉफीत चार अर्धशतके झळकावली आहेत. यात त्याचे दोन स्कोअर ९० आणि ९४ असे होते.
बातम्या आणखी आहेत...