आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटने घेतली लक्झरी ऑडी, धोनी-तेंडुलकरसह \'हे\' क्रिकेटर्सही नाहीत मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार क्रिकेटर विराट कोहलीने नुकतीच Audi R8 LMX कार खरेदी केली आहे. असा दावा केला जातो की जगातील ही सर्वात वेगवान ऑडी कार आहे. या जर्मन लक्झरी ब्रँडने भारतासाठी फक्त चार कार तयार केल्या आहेत. कारची एक्स शोरूम किंमत 2.97 कोटी रुपये आहे. जगामध्ये फक्त 99 लोकांकडेच या कार आहेत.

आजवरचे शक्तिशाली मॉडेल
ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांच्या मते, ही ऑडीची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली कार आहे. कारमध्ये 5200 सीसीचे व्ही 10 इंजिन आहे. 0-100 किमीचा वेग फक्त 3.4 सेकंदांत पकडू शकते. 7 स्पीडचा गिअरबॉक्स असलेली कार टॉप स्पीडमध्ये 320 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. कारमधील लेझर हाय बीम लायटिंगमुळे 500 मीटरपर्यंत स्पष्ट दिसू शकते. विराट कोहलीने ही लक्झरी कार खरेदी केली असली तरी अनेक भारतीय क्रिकेटर कारचे चाहाते आहेत. दिव्य मराठी डॉट कॉम तुम्हाल कोणत्या क्रिकेटरकडे कोणती लक्झरी कार आहे याची माहिती देत आहे.
बीएमडब्ल्यू, लॅम्बोर्गिनी आणि ऑडी क्रिकेटरची पहिली पसंत
सामना जिंकल्यानंतर बहुतेकवेळा लक्झरी कार आणि महागड्या बाइक बक्षीसाच्या रुपात मिळतात. लक्झरी कार खेळाडूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. फेरारी, बीएमडब्ल्यू, लॅम्बोर्गिनी आणि ऑडी सारख्या कार अनेक क्रिकटर्सची पहिली पसंत आहे. सचिन आणि धोनीचे एफ-1 प्रेम तर जगजाहीर आहे. सचिन तर दरवर्षी होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतीय क्रिकटेर्स आणि त्यांच्या लक्झरी कार