आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किवींविरुद्ध टीम इंडिया सज्ज; खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - येत्या गुरुवारपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे. विराट कोहलीने सोमवारी आपल्या ट्वि टरवर टीम इंडिया गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत फोटो शेअर केला. या फोटोसह कोहली म्हणाला, ‘आजचा दिवस थकवणारा होता. आमची तयारी चांगली झाली असून, आजची कठोर मेहनत, तयारी एकदाची संपली. मी जी काही मेहनत घेतो, त्यासाठी आनंदीत आहे. नो पेन, नो गेन..' असे म्हणत मेहनत घेतल्याशिवाय यश मिळणार नाही, असे संकेत कसोटी कर्णधार कोहलीने दिले.
कानूपरची खेळपट्टी फिरकीपटूला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडला सापळ्यात अडकवण्यासाठी टीम इंडिया फिरकीचे जाळे टाकणार असल्याचे संकेत आहे.टीम इंडियाने रविवारपासून सरावाला सुरुवात करायची होते. मात्र, कानपूर येथे पाऊस सुरू असल्याने भारताचा पुरेसा सराव होऊ शकला नाही. कोच अनिल कुंबळे, कर्णधार कोहली, अजिंक्य रहाणे, रोहितसह भारतीय खेळाडू येथे पोहोचले आहेत.

कानपूरची खेळपट्टी देणार फिरकीपटूंना साथ : रहाणे
पहिल्या कसोटीसाठी रहाणेसुद्धा कानपूरला पोहोचला आहे. त्याने खेळपट्टीची पाहणी केली. कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी आहे, असे या वेळी अजिंक्य रहाणेने म्हटले. येथील हवामान आमच्या हातात नाही. मात्र, ही खेळपट्टी संथ आणि फिरकीला अनुकूल अशी दिसते. आम्ही यानुसार रणनीती तयार करू, असे तो म्हणाला.

न्यूझीलंडच्या वनडे संघात अँडरसन
वेलिंग्टन | येत्या १६ अाॅक्टाेबरपासून यजमान भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुुरुवात हाेणार अाहे. स्टार अाॅलराउंडर काेरी अँडरसनला या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात संधी देण्यात अाली. खास फलंदाजाच्या भूमिकेत ताे या मालिकेत न्यूझीलंड टीमकडून खेळणार अाहे. तसेच जखमी वेगवान गाेलंदाज टीम साउथीला वनडे मालिकेत स्थान मिळाले अाहे. मात्र, त्याचा सहभाग अद्याप अनिश्चित मानला जात अाहे. गंभीर दुखापतीमुळेच त्याला कसाेटी मालिकेतून बाहेर पडावे लागले. येत्या गुरुवारपासून भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांची मालिका सुरू हाेत अाहे. फलंदाज डेविच, अाॅलराउंडर जिमी निशाम अाणि वॉटलिंगची वनडे मालिकेसाठी संघात निवड करण्यात अाली.

न्यूझीलंड संघ : केन विलियम्सन (कर्णधार), काेरी अँडरसन, ट्रेंट बाेल्ट, डग ब्रासवेल, डेविच, मार्टिन गुप्तिल, मॅट हेन्री, राेंची, सॅटनेर, ईश साेढी, टीम साउथी, रॉस टेलर, बी.जे. वॉटलिंग, जेम्स निशाम.
छायाचित्र: कर्णधार कोहलीने सोमवारी भुवनेश्वरसोबत हा फोटो ट्विट केला.
बातम्या आणखी आहेत...