आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडेच्या इतिहासात आतापर्यंत कुणीच करू शकले नाही ते धोनीने करून दाखवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने वन डे क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा स्टम्पिंग करणारा तो विकेटकीपर बनला आहे. यासोबतच, तो स्टम्पिंगचे शतक करणारा जगातील पहिला विकेटकीपर सुद्धा बनला आहे. हा कारनामा त्याने श्रीलंका विरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत आपला 301 वा मॅच खेळताना केला आहे. 
 
 
सलग दोन मॅचमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
- श्रीलंका विरुद्ध पाचव्या वनडे मॅचमध्ये 44.6 ओव्हर्समध्ये चहलच्या चेंडूवर अकीला धनंजय याला स्टम्पिंग करून त्याने वनडे करिअरचे शंभरावे स्टम्पिंग पूर्ण केले. 
- यासोबतच तो जगातील सर्वाधिक वनडे स्टम्पिंग करणारा क्रिकेटर बनला आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आहे. ज्याने वनडे करिअरच्या 404 व्या मॅचमध्ये 99 स्टम्पिंग केल्या आहेत. 
- धोनीने सलग दोन मॅचमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. यापूर्वीच्या अर्थात श्रीलंका विरोधातील सिरीजच्या चौथ्या सामन्यात त्याने वनडे इतिहासातील सर्वाधिक वेळा नॉटआउट राहण्याचा विक्रम केला आहे. 
- धोनी 73 वेळा नॉटआऊट राहिला आहे. असे करून त्याने दक्षिण अफ्रिकेच्या शॉन पोलाक आणि चामिंडा वास या दोघांना पछाडले आहे. ते दोघे प्रत्येकी 72-72 वेळा नॉट-आऊट होते.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीनंतर सर्वाधिक वेळा स्टम्पिंग करणारे विकेटकीपर्स....
बातम्या आणखी आहेत...