आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरू गेटवर सेहवागच्या पत्नीने केले ट्वीट, पण DDCA ने केली मोठी चूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट डेस्क - दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट स्टेडियमच्या गेट नंबर 2 ला वीरेंद्र सेहवाचे नाव दिले आहे. यासाठी एक छोटेखानी समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र या समारंभात सेहवागची पत्नी आरतीला यात सहभागी होता आले नव्हते. त्यानंतर आरतीने सेहवागबद्दल असलेली भावना ट्वीटद्वारे व्यक्त केली. आरतीने सलग दोन ट्वीट केले. यात म्हटले आहे की, एक खेळाडू म्हणून वीरेंद्र सेहवागने मिळविलेल्या यशाबद्दल अभिमान आहे. 
 
- आरती सेहवाग म्हणाली की, वीरेंद्र असा व्यक्ती आहे ज्याने मला शिकविले की आयुष्य हे अॅचिव्हमेंटपेक्षा खूप मोठ्ठे आहे. तरीही वीरेंद्रने मिळविलेले यशाचा मला अभिमान वाटतोय. तुमच्या नावाचे गेट पाहून खूप आनंद होतोय.
- वीरेंद्र सेहवाग दिल्लीचा क्रिकेटर आहे. सेहवागने 1997मध्ये दिल्लीतून स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
 
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
- गेटच्या उद्घाटनप्रसंगी वीरेंद्र म्हणाला की, हा माझा खूप मोठा सन्मान आहे. मला यानिमीत्त जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय. दररोज याच गेटने आम्ही दररोज ये-जा करीत असू. 
- दिल्लीतून आणखी खेळाडू तयारी होतील. ज्यांच्या नावे गेट, स्टँड आणि पव्हेलियन असतील. मला आनंद आहे की असा सन्मान मिळविणारा मी पहिलाच क्रिकेटर आहे. डीडीसीएचे धन्यवाद.
- तब्येत चांगली नसल्याने माझी आई आणि पत्नी याठिकाणी येऊ शकली नाही. ते आज इथे असते तर आनंद द्विगुणित झाला असता.
 
 
बातम्या आणखी आहेत...