आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसेलच्या चेंडूने मोडला सॅमीचा हात, महिनाभर घ्यावी लागणार सक्तीची विश्रांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी सॅमी फिजिओसोबत मैदानाबाहेर येताना. - Divya Marathi
जखमी सॅमी फिजिओसोबत मैदानाबाहेर येताना.
जमैका - कॅरेबियन प्रीमियर लीगमध्‍ये (सीपीएल) सेंट लुसिया जॅकचा कर्णधार डॅरेन सॅमीचा हात तुटल्‍याने तो महिनाभरासाठी क्रिकेट खेळणार नाही. त्‍यामुळे तो उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मंगळवारी एका मॅच दरम्‍यान जमैका तलावाह विरोधात बॅटिंग करताना सॅमीच्‍या डाव्‍या हातावर वेगवान गोलंदाज आंद्रे रसेल याचा चेंडू लागला.
सॅमीकडून मिळते प्रेरणा
या घटनेबद्दल खंत व्‍यक्‍त करताना सीपीएलचे निर्देशक टॉम मूडी म्‍हणाले, ' ही घटना खूप वाईट आहे, सॅमी सीपीएलच्‍या मोठ्या नावांपैकी एक आहे. तो संघाला प्रेरणा देणारा खेळाडू आणि उत्‍तम कर्णधार आहेत. त्याने लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. '
सॅमी फॉर्मात...
सॅमीने यंदा त्याच्या खेळीच्या जोरावर सीपीएलमध्‍ये संघाला तीन सामने जिंकून दिले आहेत. सहा डावांत त्याने 124.61 च्‍या सरासरीने 81 धावा आणि सहा विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याच्या अनुपस्‍थितीत स्‍टार फलंदाज केवीन पीटरसन नेतृत्‍व करणार आहे. तर त्याच्या जागी केरॉन कौटीला संघात स्थान देण्यात आले आहे.
जमैका तलावाह विजयी
दरम्यान, सॅमीला दुखापत झालेली असली तरी त्याच्या संघाने सामन्यात विजय मिळवला आहे. सेंट लुसिया जॅक्‍सने प्रथम फलंदाजी करत जमैकाच्या संघासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले. जॅक्‍सतर्फे पीटरसनने 57 चेंडूत 83 धावांची खेळी केली. त्यात 6 चौकार आणि 4 छटकारांचा समावेश होता. प्रत्‍युत्‍तरात जमैका तलावाहने 16 षटकांतच विजय साकारला. वॉल्टनने 76 आणि क्रिस गेलने 64 धावा ठोकत विजयी कामगिरी पूर्ण केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS