आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७ एप्रिल रोजी आयपीएलचा सोहळा, ८ एप्रिलला केकेआर वि. मुंबई इंडियन्स सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - आयपीएल २०१५ चा भव्य उद्घाटन सोहळा येत्या ७ एप्रिल रोजी सॉल्टलेक स्टेडियमवर होईल. बीसीसीआयने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कार्यक्रमाला ७.३० वाजता सुरुवात होईल. यात बॉलीवूडचे तारेही सहभागी होतील. बॉलीवूडचे कोणते तारे-तारका सहभागी होतील, याबाबत अद्याप निश्चित माहिती देण्यात आलेली नाही.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, "कलाकारांची नावे लवकरच घोषित केली जातील. या कार्यक्रमाची ऑनलाइट तिकिट विक्री शुक्रवारी ५ नंतर सुरू होईल.' स्पर्धेचा पहिला सामना गतचॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स यांच्यात होईल.

बी. अरुण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सहायक प्रशिक्षक

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना आयपीएल-८ साठी रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सने सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. अरुण प्रथमच आयपीएलमध्ये प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. माजी अष्टपैलू अरुण आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेंट वुडहिल आणि गोलंदाजी कोच अॅलन डोनाल्डसोबत नवी जबाबदारी सांभाळतील.

चाचणीनंतर नरेनला परवानगी

वेस्ट इंडीजचा जादुई फिरकीपटू सुनील नरेनला आयपीएल-८ मध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, यासाठी त्याला गोलंदाजी चाचणीला सामोरे जावे लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी ही माहिती दिली. मागच्या वर्षी चॅम्पियन्स टी-२० लीगच्या वेळी सुनील नरेनची गोलंदाजी शैली संदिग्ध असल्याचे आढळले होते. यामुळे त्याला चेन्नईविरुद्ध सामन्यासाठी संघातून बाहेर व्हावे लागले होते. गोलंदाजी संदिग्ध असल्यामुळेच सुनील नरेन ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजकडून खेळू शकला नाही.
डुमिनीच्या नेतृत्वात यंदा नव्या जोशात खेळणार डेअरडेव्हिल्स
आयपीएलमध्ये सलग दोन वेळा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ आयपीएलमधील चोकर्स संघ बनला आहे. दिल्लीला मागच्या सात वर्षांत एकदाही विजेतेपद जिंकता आले नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यंदा संघ नव्या जोशात मैदानावर उतरण्याची तयारी करत आहे. आकडे आणि विक्रमांचा विचार केला असता यंदा दिल्लीचा संघ काही नवीन करेल. मात्र, हे सर्व दिग्गज खेळाडू मैदानावर कसे प्रदर्शन करतात, यावर अवलंबून आहे.
वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात दिल्लीने दोन वेळा उपांत्य फेरी गाठली. चांगल्या प्रदर्शनानंतरदेखील संघाला बाहेर पडावे लागले. संघाने १० कोटी रुपयांचा दिनेश कार्तिकसोबत करार केला, तरीदेखील परिणाम शून्य ठरला. दुसऱ्यांदा दिनेशला १० कोटींत खरेदी केले, तरी फ्लॉप कामगिरी राहिली.
आयपीएलमध्ये अमित मिश्राने आतापर्यंत ८६ लढतींत ७.१९च्या सरासरीने १०२ बळी घेतले. मोहंमद शमीने २३ लढतींत ८.५५च्या सरासरीने १३ विकेट घेतल्या. फलंदाजीत युवराजने ८४ लढतींत १३१च्या स्ट्राइक रेटने १८५१ धावा काढल्या. ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

युवराजची १६ कोटींत खरेदी

दिल्ली संघाने युवराज सिंगला १६ कोटींमध्ये खरेदी करत हे सिद्ध केले की, युवराज सध्या भारतीय संघातून बाहरे असला, तरी तो टी-२० क्रिकेटचा स्टार आहे. युवराजसह कर्णधार जेपी डुमिनी, श्रीलंकेचा अष्टपैलू अँग्लो मॅथ्युज, वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज मो. शमी आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा आणि दक्षिण अाफ्रिकेचा अष्टपैलू एल्बी मॉर्केल यांच्यावर संघाला विजयी करण्याची जबाबदारी आहे.