आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JOHN CENA Beat RUSEV At UNITED STATES TITLE MATCH

PHOTOS: रिंगमध्ये झालेल्या धुलाईनंतर रेसलरला कोसळले रडू, जॉन सीना ठरला चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मयामी - वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंटच्या (WWE) यूनायटेड स्टेट फाइट दरम्यान एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन जॉन सीनाने धो-धो धुत असल्यामुळे रेसलर रुसेव रिंगमध्ये रडू लागला. जवळपास एक तास चाललेल्या या फाइटमध्ये जॉन सीना विजयी ठरला. रुसवे डोळे पुसत रिंगबाहेर पडला. मात्र जॉन सीनासाठी ही फाइट फार सोपी राहीली नाही, बुल्गेरियन पैलवान रुसवेने जवळपास फाइट जिंकलीच होती, मात्र बराचवेळ फाइट चालल्यामुळे तो थकला होता, आणि त्याचाच फायदा जॉनने उचलला. त्याने शेवटच्या काही मिनीटात जोरदार पुनरागमन करत विजयश्री मिळवली.
फ्लाइंग किक, बॅक पंचेसची बरसात
जॉन सीना आणि रुसेव यांच्यातील लढतीत अनेक धक्कादायक मुव्ह पाहायला मिळाले. रुसेव फ्लाइंग किकसाठी प्रसिद्ध आहे, तर जॉन प्रतिस्पर्धी पैलवानवर संधी मिळेल तेव्हा बॅक पंचेस देण्यासाठी ओळखला जातो. एक तासांच्या या तुंबळ युद्धादरम्यान रुसेव कित्येकवेळा जॉन सीनाला वरचढ ठरताना दिसला. मात्र अनुभवी जॉनने शेवटी डाव आपल्या बाजूने फिरवला. जेव्हा जॉन सीनाच्या माऱ्याने रुसेव रिंगमध्ये गलीतगात्र झाला, तेव्हा त्याने आपली सिग्नेचर मुव्ह 'यू कांट सी मी' (प्रतिस्पर्धी पैलवानाच्या चेहऱ्याकडे पाहून स्वतःकडे पाहाण्याचा इशारा करत) लगावला.
फोटो - रुसेववर जोरदार मारा करताना जॉन सीना