आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहली टाकणार धाेनीला मागे; श्रीलंकेत भारत ठरेल सरस संघ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- विराट काेहलीने अापल्या कणखर नेतृत्वातून  सलगच्या विजयाच्या बळावर यजमान श्रीलंकेविरुद्धची कसाेटी मालिका यशस्वीपणे भारतीय संघाच्या नावे करून दिली. भारताने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेतली. यातून काेहलीने अापल्या सक्षम नेतृत्वाचा प्रत्यय अाणून दिला. अाता हाच कर्णधार विराट काेहली अापल्या टीमच्या माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनीला मागे टाकण्याच्या तयारीत अाहे. धाेनीने अापल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ३० पैकी ६ कसाेटी सामन्यांत विजय मिळवून दिला अाहे. गत सामन्यातील विजयाच्या बळावर काेहलीने धाेनीच्या कामगिरीशी बराेबरी साधली. अाता काेहली हा तिसऱ्याविजयाच्या बळावर माजी कर्णधार धाेनीला मागे टाकू शकताे. या कामगिरीपासून ताे एका पावलावर अाहे. त्याने हे या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी ताे सज्ज अाहे. 

येत्या शनिवारपासून यजमान श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या अाणि शेवटच्या कसाेटीला सुरुवात हाेणार अाहे. पल्लेकलच्या मैदानावर या कसाेटी सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. अाता तिसऱ्या विजयासह भारतीय संघ यजमानांना क्लीन स्वीप करण्यासाठी उत्सुक अाहे. त्याची भारताला माेठी संधी अाहे. 

काेहलीचे वेगवान सहा कसाेटी विजय 
टीम इंडियाच्या विराट काेहलीने सर्वात वेगवान सहा कसाेटी विजय संपादन करण्याचा पल्ला अल्पावधीमध्ये गाठला. त्याने अापल्या सक्षम नेतृत्वाच्या बळावर भारताला १२ कसाेटी सामन्यात ६ वेळा विजय मिळवून दिले. याशिवाय त्याने झटपट धाेनीच्या कामगिरीशी बराेबरी साधली. हे यश विराट काेहलीने अातापर्यंत १२ कसाेटीत संपादन केले.

टीम इंडिया पाकवर कुरघाेडी करणार 
भारतीय संघ श्रीलंकेमधील सर्वाधिक विजय संपादन करणारा पहिला संघ ठरेल. श्रीलंकेतील सर्वात यशस्वी संघांची नाेंद टीम इंडियाच्या नावे हाेईल. दुसऱ्या कसाेटीतील विजयाच्या बळावर भारताने ६ अाॅगस्ट राेजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या कामगिरीशी बराेबरी साधली. पाक व भारताच्या नावे  श्रीलंकेत प्रत्येकी ८ विजयाची नाेंद झाली अाहे. अाता एका विजयासह बळावर भारताच्या नावे सर्वाधिक विनिंगची नाेंद हाेईल.
बातम्या आणखी आहेत...