आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियात फूट? कोहलीचे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न, रैनाकडून बचाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांगलादेशच्या विरोधात वनडे मालिकेत सलग दोन सामन्यांत पराभव पत्करून मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात 77 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने प्रतिष्ठा राखली आहे. पण ड्रेसिंग रूममधील वातावरण मात्र काहीसे ठीक नसल्याचे दिसते आहे.
सामन्यापूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने नाव न घेता धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. तर सुरेश रैनाने मात्र सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनीचा बचाव केला. धोनीला सन्मान मिळायला हवा असे रैना म्हणाले. अश्विननेही धोनीसाठी मैदानावर प्राण द्यायलाही तयार असल्याचे म्हटले होते. पण संघातील सदस्यांच्या वक्तव्यांमुळे टीम इंडियात गटबाजीची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाला कोहली...
कोहली एका वाहिनीशी बोलताना म्हणाला की, आम्ही निर्णय घेण्यात गोंधळललो दिसतो आहोत. मैदानावरही तसेच जाणवत आहे. मला स्वतःला ते सांगण्याची गरज नाही. क्रिकेट पाहणारे आणि चाहते यांना आम्ही मोकलेपणाने खेळत नसल्याचे लक्षात येतच असेल. पहिल्या दोन सामन्यांत आमचे उद्दीष्ट स्पष्ट नव्हते आणि त्यामुळे आम्ही मोकळेपणे खेळू शकलो नाही.

सुरेश रैना
सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश रैना म्हणाला की, तुम्ही अशा प्रकारे धोनीचा अपमान करू शकत नाही. एका मालिकेच्या पराभवाने त्याचे नेतृत्व कमकुवत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. तो मानसिकरित्या अत्यंत मजबूत कर्णधार आहे. त्याला खेळाबाबत माहिती असून सकारात्मक दृष्टीने तो खेळतो. धोनी चांगला व्यक्ती आणि महान कर्णधार आहे.

धोनीच्या कोचने दिले होते संकेत
धोनीचे पूर्वीचे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य म्हणाले होते की, धोनीला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसते आहे. धोनीने आता कर्णधारपद सोडून एक खेळाडू म्हणून खेळायला हवे असेही ते म्हणाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...