आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न ३० लाख, खर्च साडेतीन कोटी!, आयपीएल प्लेऑफ सामना : एमसीएला पश्चात्ताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल क्रिकेटमुळे खेळाडू प्रशिक्षक व आयोजक मालामाल झाले असले तरीही मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) मात्र, आयपीएल उपांत्य फेरीचा (प्लेऑफ) सामना घेतल्याबद्दल आता पश्चात्ताप होत आहे.

नेमक्या याच गोष्टीचा आता या बॉक्सेसच्या मालकांना लाभ होणार आहे. कारण आयपीएल ‘नॉक आऊट’चे सामने बीसीसीआयचे सामने आहेत. करारातील अटी व शर्तीनुसार एमसीएला प्रत्येक कॉर्पोरेट बॉक्सेसमधील क्षमतेनुसार, म्हणजे प्रत्येकी २० किंवा ३० पासेस द्यावे लागणार आहेत.

हे पासेस एमसीएला बीसीसीआयकडून तिकिटांच्या स्वरूपात आणि किमतीत विकत घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक आसनासाठी १५ हजार रुपये एमसीएला मोजावे लागतील. त्यामुळे त्यासाठी एमसीएला सव्वा कोटी रुपयांच्या जवळपास पैसे द्यावे लागणार आहेत.

कॉर्पोरेट बॉक्सेसना विनामूल्य तिकिटे देणार, हे आता स्पष्ट झाल्यामुळे एमसीएच्या उच्च संलग्न क्लबनी आम्हालाही विनामूल्य तिकिटे पाहिजेत, असा सूर काढायला सुरुवात केली आहे. त्याशिवाय एमसीएच्या सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि पाहुण्यांवर भोजन व अल्पोपाहारासाठीचा खर्चही एक कोटीच्या घरात जाणार आहे.

शिवाय सामन्यासाठी लागणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठीही एमसीएलाच पैसे मोजावे लागणार आहेत. तो खर्चही २५ ते ४० लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. म्हणजे तीन ते साडेतीन कोटींचा एकूण खर्च एमसीएला करावा लागणार असून त्यांना मोबदल्यात बीसीसीआयकडून सामन्याच्या आयोजनासाठी मिळणार आहेत अवघे ३० लाख रुपये.

अायाेजन महागात
प्लेऑफ व अंतिम सामने ही बीसीसीआयची मालमत्ता आहे. सामन्यातील नफ्यावर बीसीसीआयचा हक्क आहे. बदल्यात बीसीसीआय या सामन्यांच्या आयोजनासाठी ३० लाख रुपये यजमान असोसिएशनला देते. २२ मे रोजी होणाऱ्या त्या सामन्याचे आयोजन म्हणूनच एमसीएला महागात पडणार आहे.