आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michel Stack Injured Not Play In Ipl Starting Matches

स्टार्कसाठी बंगळुरूला करावी लागेल प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - आयसीसी वर्ल्डकप २०१५ मध्ये "मॅन ऑफ द टुर्नामेंट'चा मानकरी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. यामुळे तो पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांत खेळू शकणार नाही.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (आरसीबी) खेळणारा २५ वर्षीय कांगारूंचा गोलंदाज स्टार्क गुडघ्याच्या दुखापतीमुळे दोन आठवडे ऑस्ट्रेलियात उपचार घेणार आहे. स्टार्कने मागच्या वर्षी आरसीबीकडून खेळताना १४ सामन्यांत १४ गडी बाद केले होते. त्याच्या अनुपस्थितीत बंगळुरूच्या गोलंदाजीची मदार वरुण अॅरोन, अशोक डिंडा, युवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज सीन अॅबोट यांच्यावर असेल.

नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये स्टार्कने ३०.५० च्या इकॉनॉमी रेटने २२ विकेट घेऊन मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. डावखूरा मिशेल स्टार्क आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे.