आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mick Schumacher: Expectations Must Not Be 'built Too High'

शुमीचा मुलगाही उतरला F1 च्या ट्रॅकवर, घेतला 320 KPH चा सुसाट वेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओस्केरस्लेबेन (जर्मनी) - फॉर्मूला-1 कार रेसिंगच्या जगतातील दिग्गज मायकल शुमाकरचा मुलगा मिकने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फॉर्म्युला-4 च्या पूर्वनियोजित सराव रेसमध्ये डेब्यू केला. ही मिकची पहिली रेस आहे. सात वेळा एफ-1 वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या शुमाकरचा 16 वर्षीय मुलगा मिक याच्या ओस्केरस्लेबेन सर्किटमध्ये एफ-4 मधील पहिल्या रेसबाबत मिडियामध्ये चांगलीच चर्चा होती. या रेसदरम्यान किमने ताशी 200 मैल (सुमारे 320 किमी) पेक्षा सुसाट वेग घेतला.

सात वर्षांपासून सराव सुरू
मिकने सात वर्षांपूर्वी कार्ट रेसमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर यंदा तो जर्मन फॉर्म्युला-4 मध्ये प्रवेश मिळवण्यात सहभागी ठरला. ही रेस ज्युनियर चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. मिकचा पिता आणि दिग्गज एफ-1 चालक शुमाकर डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या गंभीर अपघातातून सध्या सावरत आङे. शुमाकरने एफ-1 मध्ये विक्रमी 91 रेस जिंकल्या आहेत.

सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार
मिकला लोक रेस ट्रॅकवर प्रथमच पाहणार आहेत. त्यापूर्वी सराव करताना त्याची कार ताशी 100 मैल वेगात असताना धडकली होती. मात्र हा किरकोळ अपघात होता. त्यानंतरम मिक चालत कारबाहेर आला होता.

मिकला बरेच शिकायचे आहे
मिकचा व्यवस्थापक फ्रिट्स वॅन एमर्सफूट म्हणआला की, मिकला आणखी काही काळ लागणार आहे. फ्रिट्स म्हणाला, त्याचे वडील सात वेळा एफ वन चॅम्पियन आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला अजून खूप काही शिकायचे आहे, हे मी जोर देऊन सांगेन.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मिक शुमाकरची रेस, आणि वडील मायकल शुमाकर बरोबरचे काही फोटो...