आयपीएल - 8 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार
महेंद्रसिंह धोनीची मुलगी जिवा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. वर्ल्डकपहून परतल्यापासून धोनी जिथे जाईल तिथे पत्नी साक्षी आणि मुलगी जिवासह फिरताना दिसत आहे. नुकतेच चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन ब्राव्होचे 'चलो चलो' म्युझिक लॉन्च झाले त्यावेळी धोनी पत्नी आणि मुलीसह उपस्थित होता. येथे धोनीची मुलगी जिवासोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वच खेळाडूंची झुंबड उडाली होती. त्यात ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो आघाडीवर होते. या पार्टीत सीएसकेचे सर्वच खेळाडू उपस्थित होते. त्यासोबत वेस्ट इंडिजचेही खेळाडू हजर होते.
ब्राव्होला भारतीय संगीताची ओढ
म्युझिक लॉन्चमध्ये ड्वेन ब्राव्होने त्याच्या संगीत प्रेमाबद्दल सांगितले. तो म्हणाला, मला सर्वाधिक भारतीय संगीत हे माझ्या सर्वाधिक आवडीचे आहे. जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी डीजे ब्राव्हो असतो. त्याचे 'चलो चलो' भारतात लॉन्च झाले, याचे त्याच्या सांगितीक करिअरमध्ये मोठे महत्त्व असल्याचे तो म्हणाला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जिवासोबत क्रिकेटर्सचे फोटो