आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवावर टीम इंडियाचे मंथन, धोनीने मागितली कोहलीकडे मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशच्या विरोधात पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवावर टीम इंडियाने मंथन करण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी नाश्त्याच्या वेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने याबाबत विराट कोहलीबरोबर चर्चा केली. यावेळी टीम डायरेक्टर रवी शास्त्रीही चर्चेत सहभागी झाले होते. धोनीने विराट कोहलीला नेतृत्वासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले जात आहे. कसोटी कर्णधार विराट कोहली वन डेमध्येही टीम इंडियाचा उपकर्णधार आहे.

धोनी गोंधळलेला ?
बांगलादेशच्या विरोधातील सामन्यात धोनीचा काहीसा गोंधळलेपणा पाहायला मिळाला. मुश्तफिकर रेहमानला धक्का दिल्याप्रकरणी अडकलेल्या धोनीने आता मदतीसाठी कोहलीकडे धाव घेतली आहे.
अनेक सामन्यांत फ्लॉप ठरला कोहली
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार असलेला विराट कोहली वन डेमध्ये गेल्या अनेक सामन्यांत फ्लॉप ठरला आहे. बांगलादेशच्या विरोधातही तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता. तर त्याआधी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही तो एकच धाव काढू शकला होता. 329 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला रोहित आणि धवनने चांगली सुरुवात करून दिली होती. पण कोहली 13 चेंडूत 1 धाव करून एक वाईट फटका खेळला आणि बाद झाला.
धोनी-कोहली वाद
गेल्या काही दिवसांत अनेक वेळा धोनी आणि कोहली यांच्यातील वादाच्या बातम्या समोर आल्या आहेत. धोनीने कसोटीतून निवृत्ती जाहीर करण्यामागेही हे एक कारण असल्याचे मानले जाते. त्यातच आता रवी शास्त्री पूर्णवेळ प्रशिक्षक बनणार असल्याची शक्यता आहे. विराटही शास्त्री यांना प्रशिक्षकाच्या रुपात पाहू इच्छितो.
बातम्या आणखी आहेत...