आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन सट्टेबाज खेळाडूंची श्रीनिंकडून पाठराखण, ललित मोदींचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी सोमवारी आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना केले. आयपीएलमध्ये सट्टेबाजीसाठी एका उद्योगपतीकडून लाच घेतलेल्या चेन्नई सुपर लीगच्या तीन खेळाडूंना श्रीनिवासन हेतुत: पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी ब्रिटिश स्थलांतर दस्तऐवजासाठी मदत केल्यामुळे उठलेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेले ललित मोदी यांनी आपल्याविरुद्धचे मनी लाँडरिंगचे आरोप सिद्ध करूनच दाखवा, असे खुले आव्हान अमलबजावणी संचालनालयाला (ईडी)दिले आहे. सध्या लंडनमध्ये बस्तान ठोकून बसलेले मोदी म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून मी भारतात परतणार नाही. जेव्हा माझ्या जिविताला कोणताही धोका नाही याची मला स्वत:ला खात्री पटेल तेव्हाच मी परत येईन.

लंडन येथून एका वृत्तवाहिनीशी बोलताना ललित मोदी आयसीसीचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले, की ते मुळीच विश्वासू नाहीत. त्यांच्या चेन्नई सुपरकिंग संघातील तीन खेळाडूंना ढाल करू पाहत आहेत. मी त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ इच्छितो. देशालाही त्यांची माहिती जाणून घ्यायची आहे. देवाने त्यांच्यापासून देश आणि क्रिकेटचे तसेच खेळाचे रक्षण करावे.

दरम्यान, ललित मोदींनी जून २०१३ मध्ये लिहिलेले पत्र ईमेलद्वारे मिळाले होते या वृत्ताला आयसीसीने रविवारी दुजोरा िदला. या पत्रात मोदींनी आयपीएलमध्ये चेन्नर्ई सुपर किंग संघातील तीन खेळाडू सट्टेबाजांशी संधान बांधून होते तेव्हा संघाची मालकी श्रीनिवासन यांच्याकडेच होती. याबाबत मोदींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी युनिटकडेही (आयसीएसयू)मेलद्वारे तक्रार केली आहे. त्याची माहिती नुकतीच त्यांनी टि्वटरवर जाहीर केली होती. त्यांच्या मेलनच्या अनुषंगाने आयसीएसयू मोदींनी दिलेली कागदपत्रांची माहिती व तक्रारीची शहनिशा करत आहे. मोदींनी त्यांचा मेल बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणातून लिक झाल्याचा आरोप केला होता. राजकारणी व प्रसारमाध्यमांकडून आपल्याला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.
जडेजा, रैना, ब्राव्हो यांना बीसीसीआयची क्लीन चिट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेन्नई सुपरकिंग्ज संघातील रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि ड्वेन ब्राव्हो या तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना क्लीन चिट दिली. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. ललित मोदी यांनी या तिघांवर मुंबईच्या व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता.

ठाकूर म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात कारवाई केली नाही. त्यामुळे या खेळाडूंना क्लीन चिट आहे, हे स्पष्ट होते. सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू आयसीसीच्या कार्यकक्षेत येतात आणि आयसीसीनेच याबाबत कारवाई करायला हवी होती.

ठाकूर यांनी सांगितले, मोदींनी आयसीसीला पत्र लिहिले होते आणि त्यांनी पत्राबाबत बीसीसीआयला माहितीही दिली होती. तिघेही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्राधिकारात येतात. आयसीसीतर्फे याबाबत कुठलीही माहिती नाही. जेव्हा कोणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो तेव्हा आयसीसीची जबाबदारी असते. फक्त आयसीसीच आपल्या चौकशीबाबत उत्तर देऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...