आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियासाठी ६ जून राेजी नवा प्रशिक्षक, बीसीसीअाय सचिव ठाकूर यांची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची टीम इंडियासाठी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रशिक्षकाची शाेधमाेहीम अखेर यशस्वी झाली, असे संकेत बीसीसीअायचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले. तसेच येत्या ६ जून राेजी भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घाेषणा करण्यात येणार अाहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ अागामी बांगलादेशचा दाैरा करणार असल्याचे दिसते. भारतीय संघ ७ जून राेजी बांगलादेशला रवाना हाेणार अाहे. भारत अाणि यजमान बांगलादेश यांच्यातील एकमेव कसाेटीला १० जून राेजी प्रारंभ हाेईल. तत्पूर्वी ५ जून राेजी खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येणार अाहे, असेही ठाकूर म्हणाले.

गांगुलीची भूमिका स्पष्ट हाेणार
माजी कर्णधार गांगुलीच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क काढले जात अाहेत. भारतीय संघाच्या प्रशिक्षकापासून टीम संचालक, सल्लागार समितीच्या सचिवासाठी गांगुलीचे नाव पुढे केले जात अाहे. मात्र, ठाकूर यांनी या चर्चेवर पडदा टाकला. लवकरच गांगुलीची भूमिका स्पष्ट हाेणार अाहे.

आफ्रिका, श्रीलंकेचा भारत दाैरा, कसाेटी मालिका अायाेजन अाॅक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये
श्रीनिवासन यांच्या हातून बीसीसीआयच्या नाड्या ढिल्या पडत असल्याचा प्रत्यय बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतातील दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेविरुद्धच्या कार्यक्रमाच्या घोषणेमुळे आला आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या चार कसोटी केंद्रांसाठी अहमदाबाद, दिल्ली, नागपूर व बंगळुरू या शहरांची निवड करण्यात आली आहे. वनडे मालिकेतील पाच सामन्यांसाठी चेन्नई, कानपूर, इंदूर किंवा ग्वाल्हेर, राजकोट व मुंबईची निवड करण्यात आली आहे.

कोलकाता, मोहाली व धरमशाला येथे तीन टी-२० सामने होतील.आफ्रिकेबरोबरच्या करारानुसार होणाऱ्या मालिकेच्या प्रस्तावानुसार भारतात ही मालिका होत आहे. श्रीलंका फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेलाही भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...