आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क : क्रिकेट मैदानावर पक्षी, मधमाशा अथवा प्राणी आल्यामुळे अनेकदा सामने थांबवावे लागलेले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या शेफील्ड क्रिकेट टूर्नामेंटदरम्यान एका आश्चर्यकारण कारणासाठी सामना थांबविण्याची नामुष्की आली. हा सामना न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँडच्या संघात सुरु होता. यादरम्यान नाथ्न लायनच्या एका लहानश्या चुकीमुळे अचानक फायर अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबवावा लागला.
टोस्टने थांबविला सामना...
- हे प्रकरण ब्रिसबेनच्या एलेन बॉर्डर मैदानावर होत असलेल्या सामन्यावेळी झाले. जेव्हा न्यू साऊथ वेल्सचा स्कोअर 4 विकटवर 110 धावा होत्या. तेव्हा क्वीन्सलँडला जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची आवश्यकता होती.
- संघ विजयाच्या अगदी जवळ होता. अचानक न्यू साऊथ वेल्सच्या नाथन लायनला वाटलेकी, आता संघाला त्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ते टोस्ट तयार करण्यास निघून गेला. त्यानंतर काही क्षणात फायर अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. सामना अर्ध्यातच थांबवावा लागला.
स्वत: लायनने सांगितली घटना
- नाथल लायनने सांगितले की, मी चेंजींग रुममध्ये कंटाळवाण बसलो होतो. तेव्हा मला टोस्ट तयार करण्याची इच्छा झाली. मी सुरुवातीला टोस्टरमध्ये टाकल्यानंतर तो नीट होत नव्हता.
- त्यानंतर पुन्हा एकदा मी टोस्टरमध्ये टोस्ट टाकला. त्यानंतर माझे संपूर्ण लक्ष क्रिकेट पाहण्याकडे गेले. मी टोस्टरबद्दल विसरून गेलो. काही वेळात फायर अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तेव्हा मला टोस्टची आठवण झाली.
- फायर अलार्म वाजल्यानंतर अंपारयने सामना थांबवून खेळाडूंना चेंजींग रुममध्ये पाठविण्यात आले. त्याचशिवाय सामनाही अर्धा तास थांबवावा लागला.
- यादरम्यान अधिकारी तपासणीसाठी मैदानावर पोहोचले. दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांनाही बोलविण्यात आले. संपूर्ण मैदानाची कसून तपासणी झाल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरु करण्यात आला.
पुढील स्लाईडवर पाहा - या घटनेशी संबंधित काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.