आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूकंपाने आणखी कणखर, नेपाळसाठी वर्ल्डकप जिंकण्याची जिद्द : वेसावकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शरद वेसावकर हे नाव महाराष्ट्रातले, मुंबईतले वाटते; पण तो आहे नेपाळचा राष्ट्रीय क्रिकेटपटू. नेपाळचा संघ ब्रिटनमध्ये वर्ल्ड ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी चालला आहे. भूकंपाने नेपाळचे सारे काही हिरावून घेतले. त्यामध्ये नेपाळमधील ब्रिटिश कॉन्स्युलटही जमीनदोस्त झाली. व्हिसासाठी त्यांना सध्या नवी दिल्लीत मुक्काम ठोकावा लागला आहे. ते निमित्त साधून शरद मुंबईत आपल्या भावाच्या भेटीला आलाय.
२५ एप्रिलच्या भूकंपानंतर नेपाळच्या रस्त्यांवर धावण्याचा सराव करताना घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा आलेल्या भूकंपादरम्यान घराबाहेर पळताना ती दुखापत बळावली. म्हणून शरद मुंबईत भावाच्या आसऱ्याला आला. शरदचा भाऊ मुंबईतच पश्चिम उपनगरात राहतो. शरदही मुंबईच्या क्रिकेटमध्ये आधीपासूनच रुळलेला. त्यामुळे त्याची एकट्याची पूर्वतयारी जोरात सुरू आहे.
भूकंपानंतरच्या घटनांचे वर्णन करताना शरदच्या अंगावर शहारे येत होते. कोणत्याही आवाजाने आम्ही दचकून उठायचो आणि रस्त्यावर धावत सुटायचो, असे तो म्हणत होता.

नेपाळ क्रिकेट संघाची पात्रता विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी सुरू असताना भूकंप झाला. दोन महिन्यांचा सराव कॅम्प लागला होता. भूकंपाने मैदानच राहिले नाही तेथे सराव काय होणार? शरद म्हणाला, बीसीसीआयने मदतीचा हात दिला. त्यामुळे धरमशाला येथे नेपाळ क्रिकेट संघाला सरावाची संधी मिळाली. त्याआधी दिल्लीत ब्रिटनचा व्हिसा घेण्यासाठी नेपाळचे खेळाडू थांबले होते. शरदने त्यानंतर मुंबई गाठली. शरद म्हणाला, सुदैवाने नेपाळ क्रिकेट संघाचे खेळाडू वा कुटुंबीयांपैकी कुणाचे फारसे नुकसान झाले नाही.
निसर्गाने अामची कसाेटी पाहिली
‘निसर्गाने आमची कसोटी पाहायचे ठरवले आहे. आम्ही त्या संकटामुळे आणखी कणखर बनलो आहोत. देशवासीयांसाठी विश्वचषकात चांगली कामगिरी करायची आहे, पात्रता विश्वचषक जिंकायचा आहे. हा एकमेव विचार डोक्यात ठेवून आम्ही ब्रिटनमध्ये जाणार आहोत,’ असेही शरद म्हणाला. आई नेपाळी असल्यामुळे तो तेथे वास्तव्य करून होता.
बातम्या आणखी आहेत...