विश्वातील नंबर वन महिला गोल्फर लीडिया पुन्हा एकदा चर्चेत अाली अाहे. मात्र त्याचे कारण खेळ नसून तिचा मानवी दृष्टिकाेन अाहे. या अाठवड्यातील विजयाची संपूर्ण रक्कम नेपाळच्या भूकंपपीडितांना दान देण्याचे अाैदार्य तिने दाखवले अाहे. ती अाता नाॅर्थ टेक्सास शूटआऊट टुर्नामेंट खेळत अाहे. त्यातून िवजेती झाल्यास सुमारे १.२७ कोटी रुपये मिळणार अाहेत. ती टॉप-१० मध्ये राहिली तरी किमान २० लाख रुपये तिला मिळतील.
१७ व्या वर्षी बनली नंबर वन
लीड्स नावाने प्रख्यात असलेल्या लीडियाने अत्यंत कमी वयात शिखर गाठले अाहे. केवळ १७ व्या वर्षी ती शीर्षस्थानी पाेहाेचून १३० अाठवडे अमॅच्युअर गोल्फमध्ये प्रथम क्रमांकावर कायम अाहे. १६ व्या वर्षी एलपीजीए टूर जिंकण्याचा विक्रम तिच्या नावे अाहे. अातापर्यंत ११ व्यावसायिक स्पर्धा तिने जिंकल्या अाहेत.
वास्तव्य न्यूझीलंडमध्ये काेरियात जन्म लीडियाचा जन्म द. कोरियामध्ये झाला हाेता. तिथे सहा वर्षे राहिल्यानंतर अाई-वडील न्यूझीलंडला अाले. लीडियाला गाेल्फसाठी चांगला माहाेल देणे तसेच सुविधांबराेबरच शांतताही असेल यासाठी ते न्यूझीलंडला गेले.
बाेगी लागली तरी हसते लीडिया
काहीही चुकीचे झाले तर अापण निराश हाेताे. पण लीडिया तशी नाही. खेळताना बाेगी लागण्यासारखी चूक झाली तरी ती हसते. निराश का व्हायचे? हसायचे अाणि पुढच्या शाॅटची तयारी करायची, हाच तिचा मंत्र अाहे.
सातव्या वर्षी नॅशनल
लीडिया पाच वर्षांची असताना तिच्या मावशीने तिला प्रथम गाेल्फ शिकवले. तिला ते खूप अावडले. अवघ्या सातव्या वर्षी न्यूझीलंडमध्ये नॅशनल अमॅच्युअर चॅम्पियनशिप
खेळली हाेती.
काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये भूकंप अाला हाेता. अाम्ही खूप काही गमावले. हे दु:ख मी जाणते. त्यामुळेच ही मदत करीत अाहे.
लीडिया