आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केन विलियम्सन फलंदाजीसह अभ्यासातही परफेक्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंड टीमचा कर्णधार केन विलियम्सन हा अाजच्या घडीला जगातील सर्वाेत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जाताे. मॅक्ल्युमच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे साेपवण्यात अाली. त्याची तुलना ही भारताचा स्टार विराट काेहलीशी केली जाते. मात्र, ताे कधीही स्वभावात विराटसारखा अाक्रमक दिसत नाही. मात्र, मैदानावर अव्वल कामगिरी करण्यात ताे विराटसारखाच तरबेज अाहे. त्याने वयाच्या २० व्या वर्षी अहमदाबाद येथे भारतविरुद्ध सामन्यातून अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पण केले हाेते. यात त्याने १३१ धावांची शानदार खेळी केली हाेती. याशिवाय त्याने निवड समितीने दाखवलेला विश्वासही यशस्वीपणे सार्थकी लावला हाेता. यामुळे त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव झाला. कारण टीममधील युवा म्हणून त्याची कामगिरी काैतुकास्पद ठरली हाेती.

मैदानावरील सरस फलंदाजीसारखीच विलियम्सनची शैक्षणिक प्रगतीही काैतुकास्पद अाहे. ताे अभ्यासातही सरस अाहे. यामुळेच त्याला कॅल्क्युलेटिंग जीनियस नावाने अाळेखले जाते. यामुळे त्याला अंतिम वर्षात ‘हेड परफेक्ट’ पुस्तक देऊन गाैरवण्यात अाले हाेते.

‘केन विलियम्सनच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा संघर्षमय अाहे. यातून ताे बरेच काही शिकला अाहे. त्यामुळे त्याने सरस फलंदाजीचा गुण अात्मसात केला. हे करताना त्याच्यात प्रचंड अात्मविश्वास निर्माण हाेताे. संकटात टीमला विजय मिळवून देण्यात त्याचा हातखंडा अाहे,’अशा शब्दांत प्रशिक्षक जाेश सिम्स यांनी विलियम्सनवर काैतुकाचा वर्षाव केला. त्याला खेळाचे संस्कार हे घरातूनच मिळाले अाहे. त्याचे वडील हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले अाहेत. त्याची अाई बास्केटबाॅलपटू हाेती. याशिवाय त्याच्या दाेन्ही बहिणी व्हाॅलीबाॅलपटू राहिल्या अाहेत. त्याला एक जुळा भाऊदेखील अाहे. ताे अापला भाऊ लाेगानच्या नंतर काही मिनिटांनंतर जन्माला अाला. हे दाेन्ही भाऊ रग्बी, बास्केटबाॅल अाणि सर्फिंगमध्ये तरबेज अाहेत.सचिन हा या दाेघांचाही लहानपणापासूनचा अावडता खेळाडू अाहे. त्यामुळे त्याच्यासारखे हाेण्यासाठी विलियम्सनने क्रिकेटचा छंद जाेपासला अाहे. तसेही जुळे भाऊ-बहीण हे अापसात अनेक वेळा भांडतात. मात्र, हे दाेघे भाऊ कधीही भांडत नाहीत. एकमेकांना प्रेरणा देण्याचे ते काम करतात.
विलियम्सन हा किवी टीमचा कर्णधार म्हणून अाणि सामाजिक कार्यात सहभागी हाेणारा सरस खेळाडू म्हणून अाेळखला जाताे. पेशावर येथे शाळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने पाकमध्ये खेळताना मिळालेला सर्व सामनानिधी हा यातील जखमींना दिला हाेता. याशिवाय ताे अनेक वेळा पैसे दान करत असल्याचे दिसते. त्याने अद्याप लग्न केले नाही. मात्र, ताे बऱ्याच दिवसांपासून इंग्लंडची नर्स सारा रहीमसाेबत डेट करत अाहे. गतवर्षी जानेवारीत हे दाेघे एकत्र भेटल्याने खळबळ उडाली हाेती. त्याला क्रिकेट मंडळाने अनेक पुरस्काराने गाैरवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...