आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Open To Play Any Role For Chennai Super Kings: Michael Hussey

चेन्नईकडून कोणत्याही भूमिकेसाठी मी सज्ज : हसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - येत्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून काेणत्याही भूमिकेसाठी मी सज्ज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसी याने व्यक्त केले. चेन्नईकडून खेळायला मिळण्याचाच मला खूप आनंद असल्याचेही हसीने नमूद केले.
माझी भूमिका कोणती असावी, याबाबत मी फारसा विचार केलेला नाही. मला धोनी आणि फ्लेमिंगबरोबर बसून याबाबत चर्चा करायला हवी, असेही त्याने सांगितले. हसीने २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे.
मी पूर्णपणे तंदुरुस्त

गतवर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर त्याला मुंबईने रिलीज केले होते. त्या पार्श्वभूमीवर मी आता पूर्णपणे तंदुरुस्त असून भारतात खेळायला मला नेहमीच आवडते. चेन्नईकडून खेळण्यास डायने ब्राव्हो सज्ज असून त्याला विश्वचषकात खेळायची संधी मिळाली नसल्याने तो थकल्याचे हसी म्हणाला.
धोनी संयमित कर्णधार

धोनी हा कोणत्याही विजयाने हुरळून जाणारा किंवा एखाद्या सामन्यात मनासारखे घडत नसेल तर हताश होणारा कर्णधार नाही. तो कोणत्याही स्थितीत संयमाने वागतो, हीच त्याची जमेची बाजू आहे. त्याला माणसे हाताळण्याचे ज्ञानदेखील खूप चांगले असल्याने तो अत्यंत परिपक्व कर्णधार ठरतो.