आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलीचे शतक; पाकचा मालिका विजय; झिम्बाव्वेवर ६ गड्यांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहाेर - सलग दुसऱ्या विजयाची नाेंद करून यजमान पाकिस्तान संघाने झिम्बाव्वेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका २-० ने अापल्या नावे केली. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमानांनी ६ गड्यांनी मालिका विजय मिळवला. यापूर्वी पाकने सलामी सामना जिंकून अाघाडी घेतली हाेती. नुकताच गद्दाफीमध्ये बाॅम्बस्फाेट झाला. मात्र, पाहुण्या झिम्बाव्वे टीमने पाकचा दाैरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे.

सलामीवीर अाणि कर्णधार अजहर अली (१०२) अाणि हॅरिस साेहेल (नाबाद ५२) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर ४७.२ षटकांत सामना अापल्या नावे केला. शानदार शतक झळकावणारा अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या झिम्बाव्वे टीमने ७ गड्यांच्या माेबदल्यात यजमानांसमाेर विजयासाठी २६९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पाकच्या टीमने चार गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या पाक टीमला सलामीवीर अली अाणि सरफराज अहमदने दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने पहिल्या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी केली. चिभाभाने अहमदला (२२) बाद केले. त्यापाठाेपाठ माेहंमद हाफिज (१५) बाद झाला. शफिक व अलीने तिसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागीदारी केली. य त्यानंतर हॅरिस साेहेलने अलिसाेबत चाैथ्या विकेटसाठी ५६ धावांची केली. यात अलीने १०४ चेंडूंत अाठ चाैकारांच्या अाधारे १०२ धावा काढल्या.

हॅरिस-शाेएबची विजयी भागीदारी
हॅरिस साेहेल अाणि शाेएब मलिकने अभेद्य ६० धावांची भागीदारी करून पाक टीमचा विजय निश्चित केला. यात हॅरिसने ५२ अाणि मलिकने ३६ धावांचे (२० चेंडू) याेगदान दिले. हॅरिसने ४९ चेंडूंचा सामना करताना सहा चाैकारांसह नाबाद ५२ धावा काढल्या.
बातम्या आणखी आहेत...