आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक फिव्‍हर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला दिल्‍या शुभेच्‍छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्‍या दोन दिवसांपासून 14 देशांमध्‍ये 44 दिवस क्रिकेटचा 'रनसंग्राम' सुरु होणार आहे. प्रत्‍येक देश चॅम्पियन ठरण्‍यासाठी प्राणपणाने लढणार आहे. जगभरातील क्रीडाप्रेमींनी ऑस्‍ट्रेलिया, न्‍यूझीलंडमध्‍ये तळ ठोकला आहे. अशा वेळी भारतीय संघाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्‍या ट्विटर अकाऊंटवर शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.
प्रत्‍येक खेळाडूला दिल्‍या शुभेच्‍छा
पंतप्रधान मोदींनी टीम इंडियातील सर्वच खेळाडूंना वैयक्तिकरित्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहे. 'खेलो दिल से वर्ल्‍ड कप लाओ फिर से' असा नाराच मोदींनी टीम इंडियाला दिला आहे. भारतासाठी टीम इंडिया भुषवह कार्य करेल अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट सोबत विश्‍वचषकाला भेट दिली होती. अंतीम लढत ऑस्‍ट्रलिया आणि भारत यांच्‍यादरम्‍यानच होईल असा विश्‍वासही त्‍यांनी दाखविला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदींनी कोणत्‍या खेळाडूंना कशा पध्‍दतीने दिल्‍या शुभेच्‍छा...