आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारीत रहाणे १४ स्थानी; अश्विन नंबर वन ऑलराउंडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या कसोटी क्रमवारीत अजिंक्य रहाणे भारतीय खेळाडूंत सर्वांत पुढे आहे. दिल्ली कसोटीच्या आधी रहाणे फलंदाजांच्या यादीत २६ व्या क्रमांकावर होता. मात्र, आता तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. रहाणेने १४ स्थानांनी प्रगती केली अाहे. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. क्रमवारीत रहाणेने आता विराट कोहली (१४ वा), मुरली विजय (१६ वा) व पुजारा (१७ वा) यांना मागे टाकले. दआफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटीत रहाणेने दोन्ही डावांत शतके ठोकली होती.