स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचे नवे कोच रवी शास्त्री मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतीय संघाशी जोडण्यास इच्छुक आहेत. ते सचिनला कंसल्टंट म्हणून निवड करण्यासाठी आग्रही होते. शास्त्रींनी ही बाब बीसीसीआयच्या विशेष समितीपुढे देखील मांडली होती. मात्र, समितीने त्यांचा प्रस्ताव नकारला आहे. बीसीसीआयच्या कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्स (COA) ने मंगळवारी रवी शास्त्री यांच्या शिफारसीवर भरत अरुण यांना टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच आणि आर श्रीधर यांनी फील्डिंग कोच केले आहे.
नकारामागे हे आहे कारण...
सचिन तेंडुलकर सध्या सीएसी (क्रिकेट अॅडवायझरी कमिटी) च्या तीन सदस्यांपैकी एक आहे. याच कमिटीने रवी शास्त्री यांना हेड कोच म्हणून निवड केली. यासोबतच, सचिन IPL टीम मुंबई इंडियन्सचे मेंटर देखील आहे. टीम इंडियाशी जोडले गेल्यानंतर कुठलाही माजी क्रिकेटपटू व्यावहारिक काम करू शकत नाही. सचिनला टीम इंडियाशी जोडण्यास नकार देण्यामागे हे प्रमुख कारण आहे.
बैठकीत काय झाले?
- मंगळवारी टीम इंडियाचे बॉलिंग कोच फायनल करण्याच्या मुद्दयावर बीसीसीआयच्या 4 सदस्यीय कमिटीची बैठक पार पडली.
या विशेष कमिटीमध्ये बोर्डाचे अॅक्टिंग प्रेसिडेंट अध्यक्ष सी.के. खन्ना, सीईओ राहुल जोहरी, अॅक्टिंग सेक्रेटरी अमिताभ चौधरी आणि अॅडमिनिस्ट्रेटर्स कमिटीच्या सदस्य डायना एडुल्जी सहभागी झाल्या.
- बैठकीत रवी शास्त्रींनी सचिनला टीमचा सल्लागार म्हणून निवडण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, सचिन फुल टाईम किंवा पार्ट टाईम थेट टीमशी जोडले गेल्यास हितांच्या मुद्द्यांवर वाद होऊ शकतात असे कारण कमिटीने दिले. तसेच शास्त्रींचा प्रस्ताव नकारला.