आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राेहित परिपक्व कर्णधार असल्याचे सांगत सचिनचा राेहित शर्मावर काैतुकाचा वर्षाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाल्यापासून राेहितच्या नेतृत्वगुणांचा विकास हाेत असून ताे अधिकाधिक परिपक्व हाेत गेल्याचे मत भारताचा माजी जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले अाहे.

राेहितने जेव्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून अातापर्यंतच्या राेहितमध्ये तुलना केली तर निश्चितपणे हा फरक समजू शकताे. ताे अाता खूप चांगला कर्णधार झाला अाहे. ताे अाता अधिक अात्मविश्वासाने परिपूर्ण असा कर्णधार बनला अाहे. त्याने या काळात खूप चढ - उतार बघितले अाहेत. त्यामुळे ताे अाता खूप चांगला क्रिकेटपटू अाणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा कर्णधार बनला असल्याचे तेंडुलकरने नमूद केले.

माेसमाचा प्रारंभ बिकट
यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी मुंबई इंडियन्सचा संघ सातत्याने पराभूत हाेत हाेता. मात्र, त्या वेळीदेखील धीराेदात्तपणे त्याने सर्व परिस्थिती हाताळली. अापण सर्व मिळून परिस्थिती बदलू शकताे, हा सगळ्यांना विश्वास हाेता. त्यामुळे मुंबईचा विजय हा याेगायाेग नसून त्या सर्व कष्टांचे फळ असल्याचेही सचिनने सांगितले. अापले काम निष्ठेने करीत राहिल्यास निराशेच्या बाेगद्यानंतर कधीतरी उजेडाचा कवडसा दिसताे, यावरील विश्वास सार्थ झाल्याचेही सचिन म्हणाला. हार्दिक पंड्या, जे. सुचित अाणि विनयकुमार हे मुंबईसाठीचे यंदाचे फाइंड असून लेंडल सिमन्सने तर संघाच्या सलामीचा प्रश्नच निकाली काढल्याचेही या वेळी सचिनने सांगितले अाहे.

यंदाच्या हंगामात सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन
राेहित फलंदाज म्हणून बहुतांश माेसमांत यशस्वी झाला असला तरी यंदाच्या हंगामातील त्याचे प्रदर्शन सर्वाेत्कृष्ट हाेते. अाम्ही जे नियाेजन केले ते मैदानावर उतरवण्यात ताे यशस्वी ठरला. नियाेजन कितीही ठरवले तरी गाेलंदाजांनीदेखील तशीच गाेलंदाजी करणे, क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणे यासारख्या बाबी मैदानावरच प्रत्यक्षात अाणणे अावश्यक असते. ते राेहितने अत्यंत चांगले जुळवून अाणले. चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यातही पहिल्या धक्क्यानंतर मैदानावर उतरत त्याने लीडिंग फ्रॉम द फ्रंटचे प्रात्यक्षिक दाखवून दिल्याचेही सचिनने नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...