आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रोहित-रितिका विवाहबद्ध, रिसेप्शनमध्ये आले सचिन तेंडुलकर-नीता अंबानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित व रितिका - Divya Marathi
रोहित व रितिका
मुंबई- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा रविवारी रितिका सजदेहशी मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाला. रितिका मुंबईचीच आहे. रोहित-रितिकाचा साखरपुडा २८ एप्रिलला झाला होता. आज, सोमवारी त्यांचा संगीत समारंभ होईल.

रिसेप्शनमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, विराट कोहली, युवराज सिंह शिखर धवन व बॉलीवुड स्टार सोहेल खान, सोनाक्षी सिन्हा हिच्यासह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले होते.

नीता अंबानींतर्फे शाही पार्टी
बिझनेस वुमन नीता अंबानी यांनी रोहित शर्मा-रितिका सजदेह व हरभजन सिंह-गीता बसरा यांना शुक्रवारी ग्रॅंड पार्टी दिली. पार्टीत भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, बॉलीवुड स्टार शाहरुख खानसह अनेक सेलिब्रिटिज सहभागी झाले होते.

लग्नानंतर संगीत सेरेमनी
संगीत सेरेमनीचा कार्यक्रम लग्नाआधी होत असतो. मात्र, रोहितच्या लग्नात हा कार्यक्रम लग्नानंतर म्हणजेच 14 डिसेंबरला होणार आहे. यासाठी रितिकादेखील जोरदार सराव करत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रितिकाचा भाऊ कुणाल याने केले आहे. त्याने या कार्यक्रमाची स्वतंत्र पत्रिकाही तयार केली आहे. संगीत सेरेमनीचा हा कार्यक्रम 'द सेंट रेगिस' हॉटेलमध्ये होणार आहे.

रितिका करत आहे डान्सचा सराव
रितिका आणि रोहित यांची लग्नाची जोरजार तयारी सुरू आहे. मात्र रितिकाचा अधिक भर आहे तो डान्सवर. ती डान्सची जोरदार तयारी करत आहे. रितिकाने डान्सच्या सरावाचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर रोहितने राघवेंद्रबरोबर एक फोटो शेअर केला आहे.

हे नेते होणार सहभागी
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या लग्नासाठी काही विशेष VVIP पाहूणे उपस्थित राहणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अंबानी कुटुंब आणि सचिन तेंडुलकरसह काही विशेष मान्यवर आहेत. नुकतीच पार पडलेली दिल्ली टेस्ट सुरू असतानाच रोहित पत्रिका देण्यासाठी संसद भवनात गेला होता.

28 एप्रिलला झाला झाला होता साखरपुडा
रोहितने आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी 28 एप्रिलला मुंबईतील बोरीवली स्पोर्ट्स क्लबमध्ये गर्लफ्रेंड रितिकाला प्रपोज केले होते. यावेळीच रोहितने रितिकाच्या बोटात रिंग परिधान केली होती. रितिका मुंबईतील रहिवासी असून दोघे एकमेकांना मागील सहा वर्षांपासून ओळखतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणी- कोणी दिली रोहित व रितिकाच्या रिसेप्शनला उपस्थिती...