आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Annoyed Reports On Daughter Sara\'s Bollywood Entry

साराच्या चित्रपटांत काम करण्याच्या अफवांनी भडकला सचिन, म्हणाला-बेसलेस बातमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी संयम बाळगून राहणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी साराशी संबंधित एका अफवेमुळे चांगलाच भडकला आहे. सारा लवकरच चित्रपटांध्ये अभिनेत्री म्हणून काम करणार असल्याच्या अफवा आल्या होत्या. पण या सर्व 'बेसलेस' बातम्या असल्याचे सचिन म्हणाला. याबाबत प्रतिक्रिया देताना सचिन म्हणाला की, सध्या त्याच्या मुलीचे शिक्षण सुरू अाहे. अशा बातम्यांमुळे तो चांगलाच नाराज आहे. साराचे वय सध्या 17 वर्ष आहे.
सचिनचे ट्विट
sachin tendulkar @sachin_rt: My daughter Sara is enjoying her academic pursuits. Annoyed at all the baseless speculation about her joining films.

शाहीदबरोबर चित्रपट करणार असल्याचे होते वृत्त
सचिनच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 25 एप्रिलला ही बातमी आली होती की, त्याची मुलगी सारा ही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका चित्रपटात ती शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याचेही वृत्त होते. पण या वृत्ताला कोणताही आधार नव्हता. याच वृत्तावरून सचिनने ट्वीटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.

चित्रपटाच्या ऑफर
अनेक इव्हेंट्समध्ये ग्लॅमरस रुपात दिसणा-या साराला याआधीही चित्रपटांच्या अनेक ऑफर मिळाल्या आहेत. सध्या ती मुंबईच्या धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. सारा अनेक इव्हेंट्समध्ये सचिन आणि अंजलीबरोबर दिसून येते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सारा तेंडुलकर हिचे काही Photo's