आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकांपासून दूर राहावे लागायचे, निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याने मिळाले यश : सचिन तेंडुलकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड चिल्ड्रन्स डे निमीत्त सचिन तेंडुलकर सोमवारी दिल्ली येथे युनिसेफच्या कार्यक्रमाला आला होता. तेव्हा सचिन म्हणाला की, तेराव्या वर्षी मला क्रिकेट खेळण्यासाठी खूप प्रवास करावा लागत होता. सुरुवातीला पालकांसोबत जायचो. मात्र नंतर एकटाच प्रवास करणे सुरु केले. कित्येक महिने मला आई-वडिलांपासून दूर राहावे लागायचे. तेव्हा खूप वाईट वाटायचे. मात्र पालकांकडून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याने मला हे यश गाठता आले.

 

- सचिन म्हणाला, की लहानपणी मी खूप खोडकर होतो. माझ्या पालकांना मला आवरणे कठीण जायचे. शिक्षणापेक्षा माझे डोके खेळामध्ये अधिक चालायचे. मात्र वयासह माझ्यातली जबाबदारीही वाढत होती.

 

- आता गॅझेट्स आणि टेक्नॉलॉजीमुळे मुले खूप हुशार झाली आहेत. त्यांना ग्रुमिंगची आवश्यकता आहे, ओपिनियनची नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर स्वप्न न थोपता, त्यांना त्यांचे करिअर निवडू द्यावे.

 

बेटी धनाची पेटी, हे समजून घ्या

- सचिन म्हणतो की, मुलगी म्हणजे घरातील लक्ष्मी असते. ही गोष्ट सगळ्यांना माहितीये पण आत्मसात करीत नाहीत. आजपण मुलींना शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत तडजोड करावी लागते. 

 

मुलांसोबत पाच षटकांचा सामना

- सचिनने त्यागराज स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये भारतासाठी स्पेशल ऑलंपिक खेळलेल्या मुलांसोबत पाच-पाच षटकांचा सामना खेळला. मुलांना बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंगचे धडे दिले.
- मात्र एक ओव्हर बॅटिंग केल्यानंतर सचिन साध्या चेंडूवर आऊट झाला. मुलांनी सचिनसमवेत सेल्फिही काढले.

बातम्या आणखी आहेत...