आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन-वाॅर्न सुरू करणार टी-ट्वेंटी लीग, २८ दिग्गज खेळणार, अमेरिकेत लीग सामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सचिन तेंडुलकरचा मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी पण जवळचा मित्र आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हे दोघे मिळून लवकरच एक स्वतंत्र टी-२० क्रिकेट लीग सुरू करणार आहेत. त्याची जवळपास तयारीही पूर्ण झाली आहे. या लीगसाठी त्यांनी क्रिकेटमधील अनेक दिग्गजांसोबत करारही केले आहेत. ऑगस्टअखेर वा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लीग सुरू होण्याची शक्यता आहे. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या तसेच सचिनसोबत व त्याच्याविरुद्ध मैदानावर झुंजलेल्या अनेक महान खेळाडूंचा भरणा आहे.
४२ महिन्यांत १५ सामने, अमेरिकेत आयोजन
लीगअंतर्गत एकूण १५ सामने खेळवण्यात येतील. ४२ महिने चालणाऱ्या या स्पर्धेला "क्रिकेट ऑल स्टार लीग' असे नाव देण्यात आले अाहे. अमेरिकेला ही स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा आहे. न्यूयॉर्क, लॉस एंजलिस आणि शिकागो या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत.

यांच्याशीही झाला संपर्क
तेंडुलकर, वॉर्नने पाकिस्तानचा वसीम अक्रम, शोएब अख्तर आणि वकार युनूसशीही संपर्क केला आहे. मात्र, त्यांच्याशी अद्याप करार होऊ शकलेला नाही.

अशी अाली आयडिया
लंडनच्या लॉर्ड‌्स मैदानाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ५ जुलै २०१४ ला एक प्रदर्शनीय सामना झाला होता. त्यानंतर सचिनला या लीगची कल्पना सुचली. नंतर वॉर्नसोबत त्याने याची चर्चा केली.
या खेळाडूंशी करार
भारत : सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण.
ऑस्ट्रेलिया : ग्लेन मॅकग्राथ, मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न व ब्रेट ली.
इंग्लंड : फ्लिंटॉफ आणि वॉन.
वेस्ट इंडीज : ब्रायन लारा
द. अािफ्रका : जॅक कॅलिस, अॅलन डोनाल्ड, लान्स क्लुसनर.
श्रीलंका : महेला जयवर्धने, मुथय्या मुरलीधरन.

15.75 लाख रुपये म्हणजेच २५ हजार डॉलर्स मानधन लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला एका सामन्यासाठी दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...