आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटच्या बचावासाठी पुढे आली सानिया मिर्झा, साक्षी धोनीचेही Tweet

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास संपला आहे. या पराभवासाठी क्रिकेटचाहते विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला जबाबदार ठरवत आहेत. त्यामुळे भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा अनुष्काच्या बाचावासाठी समोर आली आहे. सानिया म्हणाली की, अनुष्का आणि विराट यांना या पराभवासाठी जबाबदार ठरवणे हे चुकीचे आहे.

सामन्यानंतर सानियाने ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली की, अनुष्काला पराभवासाठी जबाबदार ठरवणे आणि त्याची खिल्ली उडवणे अत्यंत चुकीचे आहे. महिला फक्त एखाद्याचे लक्षच विचलित करू शकते का? ती शक्तीही ठरू शकते, असे सानियाने म्हटले आहे. गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना गमावल्यानंतर सोशल मिडियावर अनुष्का शर्माला टार्गेट केले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सानिया आणि साक्षी धोनी यांचे ट्विट्स...