आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गजांसाेबत खेळण्याची स्वप्नपूर्ती, युवा फलंदाज सरफराज खानची प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - क्रिस गेल, एबी डिव्हिलर्स अाणि विराट काेहलीसारख्या अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गजांसाेबत खेळण्याने माझी स्वप्नपूर्ती झाली. तसेच अात्मविश्वासही द्विगुणित झाला अाहे, अशी प्रतिक्रिया राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा युवा फलंदाज सरफराज खान याने दिली. त्याने नुकत्याच झालेल्या अाठव्या सत्राच्या आयपीएलमध्ये विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले.

उत्तर प्रदेशच्या अाझमगड नजीकच्या खेड्यात सरफराज हा युवा फलंदाज घडला. त्याला यंदाच्या अायपीएलमध्ये प्रथमच खेळण्याची संधी मिळाली. अाठव्या सत्रासाठी बंगळुरू टीमने ५० लाखांत बाेली लावून सरफराजला घेतले हाेते.

‘अंतिम ११ मध्येही स्थान मिळण्याचीही अाशा नव्हती. मात्र, यापूर्वी केलेल्या मेहनतीच्या बळावर मला प्रत्यक्षात दिग्गजांसाेबत मैदानावर खेळण्याची संधी मिळाली अाणि यातूनच माझी स्वप्नपूर्ती झाली. तसेच अात्मविश्वासही वाढला. त्यामुळे मला राजस्थानविरुद्ध २१ चेंडूंमध्ये ४५ धावांची चमत्कारिक खेळी करता अाली,’ असेही त्याने या वेळी सांगितले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी अनुभवी खेळाडूला दिली जाते. मात्र, कर्णधार काेहलीने विश्वास ठेवून मला या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजताे. असेही तो म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...