आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंड-न्यूझीलंड दुसरी कसाेटी अाजपासून, बेन स्टाेक्सवर सर्वांची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीड्स - सलामीच्या कसाेटीतील विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला यजमान इंग्लंडचा संघ मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतणार अाहे. शुक्रवारपासून इंग्लंड अाणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसाेटीला प्रारंभ हाेत अाहे. या कसाेटीतही विजयश्री मिळवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. इंग्लंडने १२४ धावांनी विजय मिळवून दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली.

अाता मालिकेतील दुसऱ्या अाणि शेवटच्या कसाेटीत यजमानांच्या बेन स्टाेकवर सर्वांची नजर असेल. त्याने लाॅर्ड््सवर वेगवान शतक ठाेकून यजमानांचा विजय निश्चित केला. अाता दुसऱ्या कसाेटीतही त्याच्याकडून माेठ्या खेळीची अाशा केली जात अाहे.

दुसरीकडे पहिल्या कसाेटीतील अपयशातून सावरत मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचा पाहुण्या न्यूझीलंडच्या टीमचा प्रयत्न असेल. त्यासाठी पाहुण्या टीमचे खेळाडू सज्ज झाले अाहेत. त्यामुळे दुसऱ्या कसाेटीत बाजी मारून इंग्लंडविरुद्धची मालिका १-१ ने बराेबरीत ठेवण्याचे न्यूझीलंड टीमचे लक्ष्य अाहे.

मात्र, त्यासाठी न्यूझीलंडच्या गाेलंदाजांना यजमानांच्या फलंदाजांना राेखण्याचे माेठे अाव्हान असेल.

कुकला नव्या विक्रमाची संधी
इंग्लंड टीमचा कर्णधार अॅलेस्टर कुकला अाता दुसऱ्या कसाेटीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची अापल्या नावे नाेंद करण्याची संधी अाहे. त्याला इंग्लंडसाठी कसाेटीत ८९०० धावा काढण्याची संधी अाहे. त्यासाठी त्याला दुसऱ्या कसाेटीत ३२ धावा काढण्याची गरज अाहे. यासह त्याला हा विक्रमी धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठता येईल. तसेच त्याला ग्राहम गुचच्या विक्रमाला पिछाडीवर टाकता येईल.
बातम्या आणखी आहेत...