आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Afridi Drops Retirement Plan, Steps Down As Captain

शाहीद आफ्र‍िदीने सोडले टी20 चे कर्णधारपद, वाचा निवृत्‍ती बाबत काय म्‍हणाला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - शाहीद आफ्रि‍दीने ट्‌वेंटी-ट्‌वेंटी क्रीडा प्रकारातील पाकिस्‍तानच्‍या कर्णधार पदाचा राजीनामा देण्‍याची घोषणा ट्व‍िटवर केली. दरम्‍यान, यापुढेही 'टी 20'मध्‍ये आपण खेळत राहणार असल्‍याचे त्‍याने स्‍पष्‍ट केले. परिणामी, त्‍याच्‍या निवृत्‍तीच्‍या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विश्‍वचषक स्‍पर्धेत पाकिस्‍तान संघाने केलेल्‍या सुमार कामगिरीमुळे त्‍याच्‍यावर टीकेची झोड उठली होती.
शाहिदने नेमके काय लिहिले...
> शाहिदने केलेल्‍या ट्वीटमध्‍ये म्‍हटले, आपण ट्‌वेंटी-ट्‌वेंटीचे कर्णधार पद सोडत आहोत.
> त्‍याने लिहिले ''मी जगभरातील माझ्या तमात चाहत्‍यांना सांगत आहे की, मी टी-20 टीमचे कर्णधारपद सोडत आहे. यावेळी मी अल्लाहचेही आभार मानतो की हा निर्णय घेण्‍यास त्‍याने मला शक्‍ती दिली. ''
> ''मी योग्‍य प्रकारे माझी जबाबदारी पार पाडली. माझ्या मातृभूमीसाठी मी काहीतरी करू शकलो. क्रिकेटच्‍या तीनही प्रकारात खेळण्‍याची मला संधी मिळाली, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्‍मान आहे.''
> ''मी पीसीबी आणि त्‍याचे अध्‍यक्ष शहरयार खान साहब यांचाही आभारही आहे की त्‍यांनी मला कर्णधार केले होते. ''
> ''मी कर्णधारपद जरी सोडले असले तरीही यापुढे खेळत राहणार आहे.''
व्यवस्थापक म्हणाले, आफ्रिदीने उभा केला वाद....
> 'कर्णधार शाहीद आफ्रिदी 20 वर्षाच्या कारकिर्दनंतर आपला फेअरवेल टूर्नामेंट खेळत असल्याचे दिसत आहे. आफ्रिदीला ऑन फील्ड टॅक्टिक्स व ऑफ फील्ड लीडरशिपमध्ये योग्य निर्णय का घेतला नाही?, असा सवाल पाक संघाचे इंतिखाफ आलम यांनी पाच पानांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
> पाकिस्तानापेक्षा त्याला भारतीयांकडून जास्त प्रेम मिळते, असे आफ्रिदी भारताच्या दौर्‍याला जाण्यापूर्वी म्हणाला होता. त्यावरच मोठा वाद निर्माण झाला होता.
> आफ्रिदीला पत्रकार परिषदेत स्वत:वर संयम ठेवता आला नाही. टीम व्यवस्थापकांने दिलेल्या सूचनांचेही त्याने पालण केले नाही.
> दुसरी कंट्रोव्हर्सी उमर अकमलने उभी केली. ती म्हणजे अकमलने बॅटिंग ऑर्डरवर त्याला तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची ‍त्याची इच्छा आहे. ही इच्छा त्याने इमरान खानकडे बोलूनही दाखवली होती.
इंडियाविरुद्ध पराभवाचे खापर आफ्रिदीच्या डोक्यावर..
> इंडियाविरुद्ध 19 मार्चला झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवाचे खापर आलम यांनी आफ्रिदीच्या डोक्यावर फोडले आहे. आफ्रिदीने शोएब मलिकला पहिल्या षटकापासून योग्य ठिकाणी फील्डिंग लावायला हवी होती. आफ्रिदीचा ‍फिल्डिंग बाबतचा निर्णय धक्कादायक होता. लो-स्कोरिंग सामन्यात देखील आफ्रिदीने अटॅकिंग फील्ड का लावली नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे आलम यांनी म्हटले आहे.
> युवराजविरुद्ध मलिक गोलंदाजी करत असताना स्लिपमध्ये एकही फील्डर नव्हता. युवराजच्या झेलबाद करण्याच्या दोन संधी पाकने स्लिपवरच गमावल्या होत्या.
> बॅटिंगसाठी हफीजला आफ्रिदीने तिसर्‍या क्रमांकावर पाठवले नाही. त्यामुळे सरफराज देखील काहीच करू शकला नाही. इंडियन स्पिनर्सला पाकच्या फलंदाजांकडून कोणतेही आव्हान मिळाले नाही. यामुळे ईडन गार्डनवर पाक संघाने 20 धावा कमी केल्याचे आलम यांनी म्हटले आहे.
> दरम्यान, टीम इंडियाविरुद्ध फलंदाजी करण्‍यासाठी आफ्रिदी स्वत: तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
आफ्रिदीने मान्य केल्या चुका..
> टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळताना चूका झाल्याचे शाहीद आफ्रिदीने मान्य केल्या आहेत. ईडन गार्डनचे पिच समजू शकलो नसल्याचे शाहीद आफ्रिदीने म्हटले होते.
> 19 मार्चला झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट पराभव केला होता. त्यानंतर आफ्रिदीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.