आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकन क्रिकेटरच्या निमंत्रणावर घरी पोहोचली इंडियन टीम, शेअर केले फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलिंगाच्या निमंत्रणावर त्याच्या घरी पोहोचली टीम इंडिया... - Divya Marathi
मलिंगाच्या निमंत्रणावर त्याच्या घरी पोहोचली टीम इंडिया...
स्पोर्ट्स डेस्क - भारताविरुद्ध पाचव्या वनडे मॅच पूर्वी श्रीलंकन टीमचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा याने इंडियन टीमला आपल्या घरी डिनरला बोलावले होते. यावेळी जवळपास सगळेच भारतीय खेळाडू त्याच्या घरी पोहोचले. मलिंगाच्या घरी श्रीलंकेचे प्लेअर्स सुद्धा उपस्थित होते. 
 

- फायनल वनडे सामन्यापूर्वी मलिंगाने कोलंबो येथील आपल्या घरी इंडियन टीमला जेवणाचे निमंत्रण दिले. यानंतर रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर असे खेळाडू तेथे पोहोचले होते.
- या गेट-टुगेदरचे काही फोटोज फोटोज इंडियन प्लेअर्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले आहेत. तेथे एंजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला असे प्लेअर्स सुद्धा उपस्थित होते. 
- मलिंगा IPL मध्ये मुंबई इंडियन्स टीममध्ये खेळतो. त्यामुळे, इंडियन प्लेअर्ससोबत त्याची चांगली मैत्री आहे. प्रामुख्याने मुंबई इंडिअन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या त्याचे खास मित्र आहेत. 
 

इंडियन प्लेअर्सने शेअर केले फोटोज
- टीम इंडियाचा वाइस-कॅप्टन रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मलिंगाच्या घरातील फोटोज शेअर करताना लिहिले, 'ग्रेट नाइट विथ ग्रेट फ्रेंड्स'
- तर अजिंक्य रहाणेने फोटो शेअर करताना लिहिले, 'मित्रासोबत मस्त वेळ गेला. मलिंगा, आम्हाला बोलावल्याबद्दल धन्यवाद.'
- शिखर धवनने फोटो शेअर करत लिहिले, 'एंजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चांडीमलची भेट घेऊन खूप मस्त वाटले.'
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...