आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर सुनील नरेनच्या अॅक्शनची व्हावी चाचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर सुनील नरेन याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनला आयसीसीच्या इंग्लंडमधील चाचणी केंद्राने हिरवा कंदील दाखवला असला, तरीही त्याला आयसीसीच्या चेन्नई येथील केंद्रात आपली गोलंदाजीची अॅक्शन योग्य असल्याचे सिद्ध करावे लागेल. गेले दोन आठवडे सुनील नरेन याच्या समावेशावरून वाद सुरू झाला आहे.
चॅम्पियन लीगमधील सलग दोन सामन्यांमध्ये नरेनची गोलंदाजीची अॅक्शन सदोष असल्याबद्दल पंचांनी गतसाली तक्रार केली होती. त्यानंतर सुनील नरेनने लॉघ ब्रो (लेसर) येथील आयसीसीच्या चाचणी केंद्राद्वारे आपली अॅक्शन योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळविले होते. मात्र, त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे टाळले होते.
दरम्यान, नरेनला चेन्नई येथे फेरचाचणीसाठी पाठवावे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी कोलकाता नाइट रायडर्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांना कळविले आहे. नरेनच्या शैलीबाबत कोलकाता नाइट रायडर्सचा मात्र राग वेगळाच आहे. श्रीनिवासन यांच्या चेन्नई सुपर किंग्जला नरेनची गोलंदाजी अडचणीची ठरू शकते. चेन्नईचे विजेतेपदही त्यामुळे हुकू शकते, असे नाइट रायडर्सच्या चाहत्यांना वाटते. त्यामुळेच नरेनला अडकविण्यासाठी ही एक चाल खेळण्यात येत असल्याचा त्यांचा संशय आहे.
नरेनने पली अॅक्शन सुधारण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून विश्वचषकासह सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये खेळण्याचे टाळले होते. अॅक्शन सुधारण्यासाठी त्याने पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकसह अन्य नामवंत ऑफस्पिनर्सची मदत घेतली होती.