आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहली कसोटी क्रमवारीत दहावा, गोलंदाजांत एकही भारतीय नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि द. आफ्रिकेचा डेल स्टेन यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. फलंदाजांत भारताच्या विराट कोहलीने टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.
मुरली विजय २४ व्या, चेतेश्वर पुजारा २५ व्या, अजिंक्य रहाणे २६ व्या क्रमांकावर आहेत. आयसीसी गोलंदाजांच्या टॉप-१० मध्ये एकही भारतीय नाही. ऑफस्पिनर आर. अश्विन १३ व्या क्रमांकावर असून ईशांत शर्मा १८ व्या स्थानी अाहे.

स्टोक्सची भरारी
इंग्लंडच्या १२४ धावांच्या विजयात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्याची फलंदाजांच्या क्रमवारीत स्टोक्सने २७ स्थानांची प्रगतीसह ४४ वे स्थान मिळवले.
टॉप-१० फलंदाज
१. कुमार संगकारा, श्रीलंका ९०९ गुण.
२. एबी डिव्हिलर्स, द. आफ्रिका ९०८
३. हाशिम आमला, द. आफ्रिका ८९१
४. स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलिया, ८७३
५. ज्यो रुट, इंग्लंड ८७२
६. केन विल्यम्सन, न्यूझीलंड ८६०
७. अँग्लो मॅथ्यूज, श्रीलंका ८४१
८. युनूस खान, पाक ८३६
९. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया ८०५
१०. विराट कोहली, भारत ७७४

टॉप- १० गोलंदाज
१. डेल स्टेन, द. आफ्रिका ९०५
२. जेम्स अँडरसन, इंग्लंड ८२९
३. रेयान हॅरिस, ऑस्ट्रेलिया ८२६
४. टी. बोल्ट, न्यूझीलंड ८२५
५. रंगना हेराथ, श्रीलंका ८०७
६. मिशेल जॉन्सन, ऑस्ट्रेलिया ८०४
७. फिलेंडर, द. आफ्रिका ७८०
८. स्टुअर्ट ब्रॉड, इंग्लंड ७७९
९. मोर्ने मोर्केल, द. आफ्रिका ७२७
१०. सईद अजमल, पाक ७१०
बातम्या आणखी आहेत...