आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli Ranks Second In ICC Test Cricket Ranking, R Ashwin Top, Ravi Jadeja Sixth

आयसीसी कसोटी क्रमवारी : रुटला मागे टाकत कोहली दुसऱ्या स्थानी, गोलंदाजांच्या यादीत आर. अश्विन नंबर वन; जडेजा सहावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दुसरे स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीत विराट कोहलीने शानदार कामगिरी करताना द्विशतक ठोकले होते. या प्रदर्शनाचा त्याला फायदा झाला. दुसरीकडे आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विन जगात नंबर वन कायम आहे. अश्विनच्या नावे ९०४ गुण आहेत.

आपल्या नेतृत्वात सलग पाच कसोटी मालिका जिंकणाऱ्या विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध मालिकेत शानदार प्रदर्शन केले. शानदार प्रदर्शनाचा त्याला ५३ गुणांचा फायदा झाला. या बळावर त्याने इंग्लंडच्या जो. रुटला मागे टाकून ८८६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. विराट कोहली टी-२० क्रमवारीत नंबर वन तर वनडे क्रमवारीत नंबर दोन आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ सध्या नंबर वन फलंदाज आहे. स्मिथचे ८९७ गुण आहेत. कोहलीच्या स्मिथपासून केवळ ११ गुणांनी मागे आहे. ताज्या क्रमवारीत सर्वाधिक फायदा युवा खेळाडू जयंत यादवला झाला. मुंबई कसोटीत शतक काढलयामुळे जयंत यादवने ३१ स्थानांची उडी घेताना ५६ वे स्थान पटकावले. रविचंद्रन अश्विन दोन स्थानांच्या नुकसानीसह ४१ व्या, तर रवींद्र जडेजा ३ स्थानांच्या नुकसानीसह ६६ व्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन नंबर वन आहे. मुंबई कसोटीत १२ गडी बाद करणाऱ्या अश्विनने सर्वश्रेष्ठ रेटिंग गुण मिळवताना ९०४ गुणांची कमाई केली आहे. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या तुलनेत ३७ गुणांनी पुढे आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत अश्विनने आतापर्यंत २७ बळी घेतले आहेत. अश्विनशिवाय रवींद्र जडेजा टॉप-१० मध्ये सामील आहे. जडेजाने एका स्थानाच्या प्रगतीसह सहावे स्थान गाठले. अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतसुद्धा अव्वलस्थानी असून बांगलादेशचा सकिब-अल-हसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स तिसऱ्या, भारताचा रवींद्र जडेजा चौथ्या तर इंग्लंडचा मोईन अली पाचव्या स्थानी आहे.
पुढच्‍या स्‍लाइडवर पहा, टॉप-१० कसोटी फलंदाज
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...