आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडीजचे क्रिकेट कोच सिमन्सचे निलंबन, संचालक मंडळाचाा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगस्टन - वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच फिल सिमन्स यांना आपल्या अंतर्गत मतभेदामुळे त्यांच्या पदावरून तत्काळ निलंबित केले आहे. मंडळाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले की, संचालक मंडळाच्या बैठकीत सिमन्सला हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. वेस्ट इंडीजचे माजी सलामीवीर सिमन्सला याबाबत माहिती देण्यात आली आहे. कॅरेबियन संघ आता पाकिस्तानविरुद्ध अरब अमिराती येथे टी-२० मालिका खेळण्यास जाणार असताना सिमन्सच्या निवृत्तीचा निर्णय समोर आला.

आता जोएल गार्नरकडे जबाबदारी सिमन्स यांची अचानक हकालपट्टी केल्यानंतर आता कॅरेबियन संघाचे मॅनेजर जोएल गार्नर आगामी मालिकेत इतर कोच हेंडरसन स्प्रिंगर आणि रोडी एस्टविकसोबत जबाबदारी सांभाळतील. सिमन्स यांना मार्च २०१५ नंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सिमन्स यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडीजने टी-२० चे वर्ल्डकप जिंकले होते.
यामुळे सिमन्सला हटवले
क्रिकेट मंडळ आणि सिमन्स यांच्यात काम करण्याची पद्धत आणि मतभेदामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने सांगितले. सिम्नस आणि मंडळात बऱ्याच मुद्द्यांवर वाद सुरू होता. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे संघाच्या निवडीवर सिमन्स यांनी प्रश्न निर्माण केले होते. यानंतर त्यांनी मंडळाने त्यांना निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यामुळे निलंबितही केले होते.
बातम्या आणखी आहेत...