Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | World Cup 2015: Anushka Sharma Cheer For Boyfriend Virat Kohli At Sydney Stadium

PHOTOS: विराट बाद झाल्यानंतर अशी होती अनुष्काची रिअॅक्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 26, 2015, 04:14 PM IST

आपल्या प्रिय मित्राला चिअरअप करण्यासाठी अनुष्का सिडनीच्या मैदानात प्रेक्षकांमध्ये बसली होती, मात्र विराट मोठी खेळी करु शकला नाही आणि अनुष्कासह लाखो चाहते नाराज झाले.

 • World Cup 2015: Anushka Sharma Cheer For Boyfriend Virat Kohli At Sydney Stadium
  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र तो तसा खेळ करु शकला नाही. केवळ एक धाव काढून विराट बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर लाखो क्रिकेट चाहत्यांप्रमाणे त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मालाही धक्का बसला. कोणाचाच विश्वास बसत नव्हता, की एवढ्या महत्त्वपूर्ण सामन्यात विराट फ्लॉप होईल म्हणून.
  त्याआधी सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच अनुष्का मैदानात आली. ती टीव्ही स्क्रिनवर दिसण्याऐवजी सोशल साइटवरच तिचे फोटो अधिक शेअर केले गेले. या सामन्यात विराट देखील वेगळ्याच अंदाजात सुरुवातीला दिसला.ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली त्यात विराटचे योगदान मोठे होते. त्याने डेव्हिड वॉर्नरचा झेल टिपला होता. सरळ हातात आलेला चेंडू त्याने कोणतीही चूक न करता अलगद टिपला होता, त्यानंतरचा जल्लोष त्याने बॉल हवेत फेकून केला होता. असे वाटत होते, की जणू काही तो मैदानात कोणाकडे तरी पाहूनच उत्साहित झाला आहे. दुसरीकडे आज त्याने गोलंदाजी देखील केली. वर्ल्डकपमध्ये विराटने प्रथमच गोलंदाजी केली.

  दिव्य मराठी डॉट कॉमने आपल्या वाचकांना आधीच माहिती दिली होती, की अनुष्का सेमीफायलन सामना पाहाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकते. दरम्यान, अशीही बातमी होती की विराटने अनुष्काला सेमीफायनल सामना पाहाण्यासाठी ऑस्ट्रेलियात येण्यास नकार दिला होता. कारण यामुळे त्याचे लक्ष्य विचलीत होईल अशी शक्यता त्याने व्यक्त केली होती. मात्र, अखेर अनुष्का सिडनीत पोहोचली आणि सर्व शक्यतांना पूर्णविराम लावला.
  फोटो - विराट केवळ एक धाव काढून बाद झाल्याने अनुष्कासह लाखो क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला.
  पुढील स्लाइडमध्ये पाहा, विराटचा जल्लोष आणि अनुष्काचा मैदानातील उत्साह

 • World Cup 2015: Anushka Sharma Cheer For Boyfriend Virat Kohli At Sydney Stadium
  प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहात असलेली अनुष्का शर्मा.
   
 • World Cup 2015: Anushka Sharma Cheer For Boyfriend Virat Kohli At Sydney Stadium
  ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू बाद केल्यानंतर जल्लोष करणारा विराट.

Trending