7 PHOTOS जे / 7 PHOTOS जे सांगतात आता शत्रू नाही मित्र आहेत धोनी आणि विराट

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 19,2015 09:09:00 AM IST
विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे सरावादरम्यान मस्ती करतानाचे फोटो समोर आले आहेत. 2015 च्या विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी कसून सराव केला. त्यावेळी धोनी आणि कोहली एकमेकांशी मस्करी करताना दिसून आले. त्यावरून या दोघांमध्ये कसलाही वाद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांची मैत्री दिसून येईल असे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे आता दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही वाद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीनंतर अचानक निवृत्ती घेतल्याने यामागे कोहली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

लंचसाठीही गेले होते सोबत
28 फेब्रुवारीला युएईच्या विरोधात झालेल्या सामन्यापूर्वीही धोनी आणि कोहली सोबत लंच करण्यासाठी गेले होते. या दोघांमध्ये वाद असल्याच्या अफवा पसरवणाऱ्या आणि या मुद्यावरून टीका करणाऱ्यांना ते उत्तर होते असे मानले जात होते.

यामुळेही होती वादाची चर्चा
धोनी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी एका मीडिया ग्रुपने ट्वीट केले होते. त्या ट्वीटला विराट कोहलीने रिट्वीट केले होते. त्यामुळेही दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गेल्या काही दिवसांत समोर आलेले विराट आणि धोनीचे काही PHOTOS
पर्थमध्ये लंचनंतर हॉटेलमधून बाहेर पडलेले धोनी आणि कोहली. (फोटो साभार : ट्वीटर)धोनी आणि विराट कोहली एकाच कारने लंचसाठी गेले होते. सोबत मोहम्मद शमीही होता.प्रॅक्टिस सेशनदरम्यान धोनी आणि कोहली.

पर्थमध्ये लंचनंतर हॉटेलमधून बाहेर पडलेले धोनी आणि कोहली. (फोटो साभार : ट्वीटर)

धोनी आणि विराट कोहली एकाच कारने लंचसाठी गेले होते. सोबत मोहम्मद शमीही होता.

प्रॅक्टिस सेशनदरम्यान धोनी आणि कोहली.
X
COMMENT