आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Botswana Safari Camp Is The New Best Hotel In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NO 1: दक्षिण आफ्रिकेच्‍या जंगलात आहे जगातील सर्वात BEST हॉटेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिका म्‍हटलं की आपल्‍या डोळयासमोर लगेचच भलेमोठे जंगल, वाघ, सिंहासारखे हिंस्‍त्र प्राणी, मोठेमोठे अभयारण्‍य यांचे चित्र येते. त्‍याचबरोबर काही हॉलिवूड चित्रपटात येथील गरीबी आणि बंदूकीच्‍या टोकावर सुरू असलेले सत्तेचे राजकारण दाखवले जाते. परंतु, या मोठया आणि विस्‍तीर्ण देशात अशाही जागा आहेत.‍ जिथे जगातील सर्वात श्रीमंत लोक आपली संध्‍याकाळ व्‍यतीत करण्‍यासाठी, फिरण्‍यासाठी, मौज-मजा करण्‍यासाठी जातात.

दक्षिण आफ्रिकेतील बोत्‍स्‍वाना देशात एक कॅम्‍प आहे. त्‍या कॅम्‍पचे नाव आहे. मोम्‍बो कॅम्‍प अँड लिटिल मोम्‍बो कॅम्‍प. मोरेमी गेम रिजर्व येथे असलेल्‍या या कॅम्‍पला जगातील सर्वात उत्‍कृष्‍ट हॉटेल मानले जाते. न्‍यूयॉर्क येथून निघणा-या ट्रॅव्‍हल+लेजर (Travel+Leisure) मासिकाद्वारे करण्‍यात आलेल्‍या सर्व्‍हेनुसार या हॉटेलला 100 पैकी 96.60 गुण मिळाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्‍या नैसर्गिक सान्निध्‍यात असलेल्‍या या हॉटेलमध्‍ये सर्व लक्‍जरी सुविधा पुरवण्‍यात येतात. येथे वाईल्‍ड लाईफचा पुरेपुर आनंद घेताना तुम्‍हाला पंचतारांकित हॉटेलची कमतरताही भासणार नाही.

divyamarathi.com आज तुम्‍हाला या हॉटेलच्‍या वैशिष्‍टयांबाबत सांगणार आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या जगातील टॉप 10 हॉटेल कोणते आहेत, आणि भारताच्‍या कोणत्‍या हॉटेलचा या यादीत समावेश होतो ?