आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Truly Inspirational Human Being: Sachin Tendulkar On Nelson Mandela

नेल्‍सन मंडेला खरेखुरे प्रेरणादायी व्‍यक्तिमत्‍व- सचिन तेंडुलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्‍णवर्णीय राष्‍ट्राध्‍यक्ष आणि वर्णभेदविरोधी लढ्याचे अग्रणी भारतरत्‍न नेल्‍सन मंडेला यांचे निधन झाले. मंडेला यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्‍यात येत आहे. नुकताच क्रिकेटला अलविदा केलेला टीम इंडियाचा खेळाडू सचिन तेंडुलकरनेही मंडेला यांना सोशल नेटवर्किंग साईटच्‍या माध्‍यमातून आदरांजली वाहिली आहे. मंडेला हे खरेखुरे प्रेरणादायी मनुष्‍य होते, असे त्‍याने म्‍हटले.

'मंडेला यांची भेट होण्‍याचा प्रसंग माझ्यासाठी कधी न विसरण्‍याजोगा आहे. ते खरेखुरे प्रेरणादायी व्‍यक्‍ती होते.' असे ट्विट त्‍याने केले. तो पुढे म्‍हणतो, 'माझ्या ह्दयात त्‍यांचे स्‍थान कायम असेल, ईश्‍वर त्‍यांच्‍या आत्‍म्‍यास शांती देवो'.

मदिबा नावाने प्रसिद्ध असलेले मंडेला यांची तब्‍येत गेल्‍या काही महिन्‍यांपासून खालावली होती. वारंवार त्‍यांना रूग्‍णालयात दाखल करण्‍यात येत असत. अखेरीस आज त्‍यांची ज्‍योत मालावली.

ऑस्‍ट्रेलिया आणि इंग्‍लंड संघाने एडिलेट कसोटीच्‍या दुस-या दिवशीचा खेळ सुरू होण्‍यापूर्वी एक मिनिट शांत उभे राहून नेल्‍सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहिली. न्‍यूझीलंड आणि वेस्‍ट इंडीज संघांनीही आदरांजली वाहिली.