आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियन अाेपन : पेस-मार्टिना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेसला टेनिस करिअरमध्ये १५ व्या ग्रँडस्लॅमवर नाव काेरण्याची संधी अाहे. या साेनेरी यशापासून ताे अवघ्या एका पावलावर अाहे. त्याने शुक्रवारी मार्टिना हिंगीससाेबत अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.

सातव्या मानांकित लिएंडर पेस अाणि मार्टिनाने मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात चीन तैपेईच्या सु वेई सियेह अाणि उरुग्वेच्या पाब्लाे कुवासवर मात केली. या जाेडीने ७-५, ६-४ अशा फरकाने सामन्यात एकतर्फी विजय संपादन केला.

बेथानी-सफाराेवाला किताब :
बेथानी माटेक व चेक गणराज्यची लुसी सफाराेवाने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जाेडीने अंतिम सामन्यात चिये-चान युंग जानला ६-४, ७-६ ने पराभूत केेेले.

सानियाचे स्वप्न भंगले : सानिया मिर्झाचे मिश्र दुहेरीत विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. फ्रान्सच्या मालाडेनाेविक व डॅनियल नेस्टरने सानिया - साेरेसवर ६-३, ६-२, १०-८ अशा फरकाने विजय संपादन केला.