आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक : इराकला 3-2 ने हरवून यूएई संघाने पटकावले तिसरे स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूकॅसल (ऑस्ट्रेलिया)- अाशिया चषक फुटबाॅल स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात संघाने (यूएई) तिसऱ्या स्थानावर धडक मारली. या संघाने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इराकवर ३-२ अशा फरकाने मात केली. यूएईसाठी १६ व्या मिनिटाला सामन्यात अहमद खलीलने पहिला गाेल केला.
त्याने इराकच्या गाेलरक्षकाला हुलकावणी देत हे यश संपादन केले. त्यापाठाेपाठ २९ व्या मिनिटाला इराकने सामन्यात १-१ ने बराेबरी साधली. सालेमने इराकसाठी गाेल केला. त्यानंतर ४२ व्या मिनिटाला अमजद कलाफने गाेल करून इराकला २-१ ने अाघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये यूएई संघाने पुनरागमन केले. अहमद खलीलने ५२ व्या मिनिटाला गाेल करून यूएईला २-२ ने बराेबरी मिळवून दिली. त्यानंतर दाेन्ही संघांत गाेल करण्याची झुंज रंगली हाेती. अखेर सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला मबकुहातने शानदार गाेल करून यूएई संघाचा विजय निश्चित केला.